ETV Bharat / politics

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा तिढा सुटेना; नारायण राणेंबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा - Sindhudurg Ratnagiri Lok Sabha - SINDHUDURG RATNAGIRI LOK SABHA

Sindhudurg Ratnagiri Lok Sabha : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीनं अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय.

Keshav Upadhyay
प्रवक्ता केशव उपाध्ये
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 9:24 PM IST

प्रतिक्रिया देताना प्रवक्ता केशव उपाध्ये

सिंधुदुर्ग Sindhudurg Ratnagiri Lok Sabha : लोकसभा निवडणूक 2024 चं बिगुल (Lok Sabha Elections 2024) वाजलं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचा (BJP) वतीनं अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केलाय. मात्र अद्याप भारतीय जनता पार्टीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात प्रचार सुरू : सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. तर किरण सामंत यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात आपला प्रचार सुरू ठेवला आहे.

भारतीय जनता पार्टी इच्छुक : सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष युवा नेते विशाल परब यांची नावं चर्चेत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये म्हणाले की, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी इच्छुक आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे चिरंजीव यांच्याबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे.

उमेदवाराचे चिन्ह कमळ असेल : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लोकसभेच्या उमेदवारासाठी आपला दावा सोडत नसल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवाराचे चिन्ह हे भारतीय जनता पार्टीचे कमळ असेल आणि उमेदवारही भारतीय जनता पार्टीचा असेल, असं सांगितलंय.

हेही वाचा -

  1. Keshav Upadhyay: भाजपचा महाविजय 2024 संकल्प, त्यादृष्टीने आजची बैठक महत्त्वाची- केशव उपाध्ये
  2. Keshav Upadhya : शेवटी लोकशाहीचा विजय होईल - केशव उपाध्ये
  3. Keshav Upadhyay Press conference : जिल्हा परिषदेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरी पालकमंत्री गप्प का? - केशव उपाध्याय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.