ETV Bharat / politics

तलवारीनं केक कापणं भोवलं! शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल - Sanjay Gaikwad News

MLA Cake Cutting Controversy : मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापणं आता शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अंगलट आलंय. काही दिवसांपूर्वीच वनविभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामुळं ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता या प्रकरणामुळं गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यावर त्यांची आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया पाहा.

Shivsena MLA Sanjay Gaikwad cake cut with a Sword, case registered against three
संजय गायकवाड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 4:14 PM IST

बुलढाणा MLA Cake Cutting Controversy : शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस गुरुवारी (15 ऑगस्ट) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं स्टेजवर वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर त्यांनी तलवारीनंच तो केक पत्नीसह मुलाला भरवला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संजय गायकवाड यांच्यासह इतर तिघांवर मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलीय.

कॉंग्रेस नेत्या जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया : या संपूर्ण प्रकरणावर संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृतीचं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले "तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीनं केक कापण्याचा हेतू कोणाचंही नुकसान करण्याचा नाही. यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. नेत्यांना तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. पोलीस परेडच्या वेळीही पोलीस तलवार दाखवतात. मग ते लोकांना धमकावतात का? ऑलिम्पिकमधील तलवारबाजीचा खेळही बंद होणार का? आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, म्हणून आम्ही तलवारीचा वापर करू. तसंच गुन्हा दाखल झाला तर आम्ही हायकोर्टात गुन्हा क्रॅश सुद्धा करू शकतो," असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी अशा प्रकारे तलवार दाखवणं हा गुन्हा नसल्याचा अजब दावा केलाय.

काँग्रेसच्या जयश्री शेळके काय म्हणाल्या? : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना कॉंग्रेस नेत्या जयश्री शेळके म्हणाल्या की, "आर्म्स ॲक्टनुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणं आणि केक कापणं गुन्हा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः हून गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलिसांवर आहे, तशीच लोकप्रतिनिधींवरदेखील आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून हे कृत्य अपेक्षित नाही. संजय गायकवाड यांनी स्वतःहून गुन्हा दखल करून घ्यावा. यापूर्वीदेखील तलवारीनं केक कापतानाचे अनेक गुन्हे जिल्ह्यासह राज्यात दाखल आहेत. गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की, त्यांच्या आमदारावरदेखील गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा एका आमदारासाठी कायद्यात बदल करा. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्या जाण्यामागे दहशत पसरवणं हा हेतू आहे. यामुळं आर्म ॲक्टमध्ये तशी तरतूद असून तो गुन्हा आहे."

हेही वाचा -

  1. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कापला तलवारीनं केक : तलवारीनं केक कापणं गुन्हा नसल्याचा दावा - MLA Sanjay Gaikwad

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.