ETV Bharat / politics

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वर्धापनदिनानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन; विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार? - Shiv Sena Foundation Day 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 11:59 AM IST

Shiv Sena Foundation Day 2024 : शिवसेनेचा आज 58 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्तानं दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे सायन येथील क्षणमुखानंद सभागृहाबाहेर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याचं दिसून येत आहे.

Shiv Sena Foundation Day 2024
Shiv Sena Foundation Day 2024 (Etv Bharat)

मुंबई Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शिवसेनेचा यंदाचा स्थापना दिन सोहळा महत्त्वाचा आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही गटांनी यावेळी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. आजच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जात असून, वरळी येथील डोम बाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तर सायन येथील क्षणमुखानंद सभागृहाबाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याचं दिसून येत आहे. हे दोन्ही नेते यावेळी नेमकं काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही गटांकडून कार्यक्रमांचं आयोजन : 2022 मध्ये 40 आमदार आणि 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आज वरळी डोम येथे सायंकाळी 5 वाजता साजरा होणार आहे. वरळी येथे आज सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटाचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली असून, या कार्यक्रमाला सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्थापना दिनाचा कार्यक्रम शिव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 7 वाजता होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय, सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख नेते आजच्या मेळाव्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याचंही बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यक्रमादरम्यान प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. या सदस्यत्वाचा कालावधी 2024 ते 2026 असा असेल.

हेही वाचा

  1. शिवसेनेच्या जन्माची कहाणी; 'डाव्यांचा विरोध ते डाव्यांची सोबत' - SHIV SENA FOUNDATION DAY 2024
  2. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
  3. देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार राज्यातील नेतृत्व, भाजपानं विधानसभा निवडणुकीकरिता दिली 'ही' महत्त्वाची जबाबदारी - Devendra Fadnavis news

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.