ETV Bharat / politics

शिंदे गटाचे स्टार प्रचारक अडचणीत, प्राथमिक सदस्यत्व सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश - LOK SABHA ELECTION 2024

State Election Commission : शिवसेना शिंदे गटामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतील सर्व नेते हे शिवसेना शिंदे गटाचे प्राथमिक सदस्य असल्याचे सिद्ध करावं, अन्यथा त्यांची नावे यादीतून वगळावीत. तसेच पहिल्या टप्प्यात सदर नेत्यांनी केलेल्या प्रवास खर्चाची सवलत देण्यात येणार नाही, असं स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगानं दिल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी दिली आहे.

State Election Commission
राज्य निवडणूक आयोग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 3:44 PM IST

मुंबई State Election Commission : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे.

काय आहे पत्रात? : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांची नावे शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट होती. हे नेते शिवसेना शिंदे गटाचे सदस्य नसताना त्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडं आक्षेप नोंदवला होता. त्यानुसार निवडणूक आयोगानं दखल घेत अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडं असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्याचं नमूद करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 77 चे उल्लंघन केल्याचं मान्य केलंय.

सदस्यत्व सिद्ध करा अन्यथा नावे वगळा : स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असलेले हे नेते शिवसेना शिंदे गटाचे प्राथमिक सदस्य असल्याचं प्रमाणित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. यामध्ये अनेक भाजपा नेत्यांची तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील नेत्यांची नावं देखील आहेत. त्यामुळं या नेत्यांची नावं वगळण्यात यावीत असं निवडणूक आयोगानं म्हटल्याचं लवांडे म्हणाले.

भाजपाने यादीच सादर केली नाही : भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अशाच पद्धतीनं अन्य पक्षातील नेत्यांची नावे असल्याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसनं तक्रार केली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडं सादर केलेली नाही. परिणामी त्यांना किमान पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी प्रवास खर्चाच्या सवलतीस नकार दिल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केल्याचं लवांडे यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का केला प्रवेश? शिवाजी आढळराव पाटील यांनी उघड केलं गुपित - Shivajirao Adhalrao Patil
  2. वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi
  3. "आपच्या अजून काही नेत्यांना तुरुंगात...", नेमकं काय म्हणाले शरद पवार? वाचा सविस्तर - Sharad Pawar News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.