ETV Bharat / politics

शिवसेना चारही जागांवर निवडणूक लढवणार, काय आहे पक्षाची भूमिका? - Konkan Graduate Constituency - KONKAN GRADUATE CONSTITUENCY

Konkan Graduate Constituency : लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक पार पडणार आहेत. त्यातच शिवसेना (ठाकरे गट), भाजपा आणि मनसेनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना देखील या चारही जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं जाहिर केलंय. त्यामुळं महायुतीतच आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे.

Konkan Graduate Constituency
शिवसेना सचिव संजय मोरे (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 9:04 PM IST

मुंबई Konkan Graduate Constituency : राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान (Lok Sabha Election 2024) पार पडल्यानंतर आता पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना (ठाकरे गट), भाजपा आणि मनसेनं उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेना देखील चारही ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. कोकण आणि मुंबई पदवीधर तर, नाशिक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी शिवसेना उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती शिवसेना सचिव, संजय मोरे यांनी दिलीय.

प्रतिक्रिया देताना संजय मोरे (ETV Reporter)

महायुतीत समन्वय नाही...? : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तर, नाशिक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला लागणार आहे. कोकणात मनसेनं अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केलीय. दुसरीकडं भाजपानं येथे निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली असताना, महायुतीतील शिवसेना देखील चार जागांवर उमेदवारी देणार असल्यामुळं महायुतीत समन्वय नसल्याची चर्चा सुरु आहे.

अंतिम निर्णय 30 तारखेला : चार ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्या लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पक्षाने तयारी केलेली आहे. तसेच या ठिकाणी पक्षाने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील वेळी चारी जागांवर शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यापैकी दोन जागा आमच्या जिंकून आल्या होत्या. आता महायुतीची ताकद असल्यामुळं आमच्या चारही जागांवर उमेदवार निवडून येऊ शकतो. मनसेनेही उमेदवारी जाहीर केलीय, तो त्यांचा निर्णय आहे. प्रत्येक पक्षानं इच्छा व्यक्त करणं यात काही गैर नाही. परंतु शेवटी महायुतीतील महत्त्वाचे नेते एकत्र बसून यावर तोडगा काढतील. 30 तारखेला होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीतून जो निर्णय होईल तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल, असंही संजय मोरे यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case
  2. पुणे अपघात प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले... - Pune Hit And Run Case
  3. मालेगावात एमआयएमच्या माजी महापौरावर अंदाधुंद गोळीबार, गोळीबाराचं नेमकं कारण काय? - Nashik crime news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.