ETV Bharat / politics

शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी, आदित्य ठाकरेंविरोधात 'हा' तगडा उमेदवार रिंगणात - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 9:48 PM IST

Updated : Oct 27, 2024, 10:29 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पुरंदर येथून विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली. कुडाळमधून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. निलेश राणेंचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे.

SHIV SENA 20 CANDIDATES LIST
शिवसेनेची दुसरी यादी जाहीर (Source - Shiv sena 'X' Handle)

यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश : संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्वमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर विश्वनाथ भोईर यांना कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली. दिंडोशीतून संजय निरुपम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांना पालघरमधून, मूरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून, तुकाराम काते यांना चेंबूरमधून, मिलिदं देवरा यांना वरळीमधून, विजय शिवतारे यांना पुरंदरमधून, निलेश राणे यांना कुडाळमधून तर राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

वरळीत तिहेरी लढत : वरळी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे सध्या या मतदारसंघातून आमदार आहेत. आताही त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मनसेनंही येथून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली. याच मतदारसंघासाठी शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं ठाकरे, देशपांडे आणि देवरा अशी तिहेरी टाईट फाईट होणार आहे.

शिवसेनेच्या 'या' 20 उमेदवारांची घोषणा

  • अक्कलकुवा - आमश्या पाडवी
  • बाळापूर- बळीराम शिरसकर
  • रिसोड - भावना गवळी
  • हदगाव - बाबुराव कदम कोहळीकर
  • नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
  • परभणी - आनंद शेशराव भरोसे
  • पालघर - राजेंद्र घेड्या गावित
  • बोईसर - विलास सुकुर तरे
  • भिवंडी ग्रामिण - शांताराम तुकाराम मोरे
  • भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
  • कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
  • अंबरनाथ - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
  • विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
  • दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
  • अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
  • चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
  • वरळी - मिलींद मुरली देवरा
  • पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
  • कुडाळ - निलेश नारायण राणे
  • कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर

हेही वाचा

  1. काँग्रेसची चौथी यादी जाहीर, 14 उमेदवारांची घोषणा
  2. भाजपा आमदार पुत्र तुतारीवर फुंकणार रणशिंग
  3. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; 'या' अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी

Last Updated : Oct 27, 2024, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.