पुणे Amol Kolhe on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुन्हा खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करत अमोल कोल्हे हे माझ्याकडे राजीनामा देत होते, असं त्यांनी सांगितलं. यावर आता अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, राजीनाम्याची गोष्ट मी कधीही पब्लिकली केली नाही. मी सतत संसदेत काम करत असून तीन वेळा संसदरत्न मिळालं असून हे संसदेत सक्रिय असल्याचं लक्षण आहे. आपणच राजीनाम्याच बोलले होते की राजीनामा देतो आणि शेती करतो. आत्ता आपणच यावर भाष्य करावं असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील कोंढवा इथं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
आढळरावांनी संसदेत किती प्रश्न विचारले ते पाहावं : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली होती. त्यावरुन अजित पवारांनी अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार यांना विनंती आहे की त्यांनी आढळराव यांनी संसदेत किती प्रश्न विचारले ते एकदा पहावं. पाणबुडी आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा काय संबंध आहे. तसंच रेल्वे मधील वाय-फाय आणि शिरुरचा काय संबंध आहे. आढळराव यांनी संसदेत विचारलेले प्रश्न आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संबंध काय? याचं उत्तर आता अजित पवार यांनी द्याव असं यावेळी कोल्हे म्हणाले.
त्यांच्यासारख्या एका राष्ट्रीय नेत्याला तळ ठोकून बसावं लागतंय : अजित पवार कालपासून शिरुर लोकसभेत सक्रिय झाले असून, सभा तसंच बैठका घेत आहेत. अजित पवारांसारख्या एका राष्ट्रीय नेत्याला शिरुर लोकसभेत तळ ठोकून बसावं लागतंय. याचाच अर्थ माझं काम बोलत असल्याचं कोल्हे म्हणाले.
हेही वाचा :