ठाणे CM Eknath Shinde Posters : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान बॉर्डरवर झळकले होते. शिंदेंचे पोस्टर्स हे अगदी लंडनपासून, कन्याकुमारी आणि थेट काश्मीरपर्यंत लागलेले दिसले होते. (Politics) येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव होत आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहे. यात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही पोस्टर पाहायला (Maharashtra Politics) मिळत आहेत.
ठाण्यातील कार्यकर्ते अयोध्येत दाखल : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून अनेक भक्त मागील अनेक महिन्यांपासून अयोध्येत दाखल झाले आहेत. ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक समर्थक देखील अयोध्येत दाखल झाले आहेत. 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स थेट अयोध्येत झळकल्यानं चर्चा सुरू झालीय.
अयोध्येत जय्यत तयारी सुरू : सोमवारी अर्थात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्तानं अयोध्या नगरीत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. देशभरातील दिग्गज लोकं या सोहळ्यासाठी अयोध्येत येणार आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेश सरकारनं जोरदार तयारी केली आहे. अयोध्येसह राज्यात विविध ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा यशस्वी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री आपला दावोस दौरा आटोपून मुंबईत परतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. तसंच हा दौरा यशस्वी झाल्याचं सांगत यामुळं राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय.
हेही वाचा: