ETV Bharat / politics

'भविष्यात जनताच त्यांना धडा शिकवेल'; शरद पवारांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल - शरद पवार

Sharad Pawar on Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर इंडिया आघाडीतील नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत आहेत. नितीश कुमार यांनी 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडत बिहारमध्ये पुन्हा एनडीएसोबत सत्ता स्थापन केलीय. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीय.

Sharad Pawar on Nitish Kumar
Sharad Pawar on Nitish Kumar
author img

By ANI

Published : Jan 29, 2024, 7:43 AM IST

मुंबई Sharad Pawar on Nitish Kumar : जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत महाआघाडीतून बाहेर पडत संध्याकाळपर्यंत त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश नवव्यांदा बिहारमध्ये सत्तेवर आले आहेत.

अशी परिस्थिती आधी कधी पाहिली नव्हती : नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "पाटणामध्ये जे काही घडले ते खूप कमी कालावधीत घडले. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. नितीशकुमार यांनीच फोन केल्याचं मला आठवते. पाटण्यातील सर्व भाजप वगळता इतर पक्षांच्या भूमिकंप्रमाण त्यांची भूमिका होती. पण गेल्या 10-15 दिवसांत असं काय झालं की त्यांनी ही विचारधारा सोडून आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी अचानक ( एनडीएसोबत) सरकार स्थापन केलं."

  • #WATCH | On Nitish Kumar taking oath as Bihar CM after joining NDA, NCP chief Sharad Pawar says, "Whatever happened in Patna, such a situation was never seen before in such a short period of time...I remember it was Nitish Kumar who had called all the non-BJP parties to… pic.twitter.com/T996TAYa5J

    — ANI (@ANI) January 28, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • जनता नितीश यांना धडा शिकवेल : यावर पुढं बोलताना शरद पवार म्हणाले की, "गेल्या 10 दिवसात ते असं कोणतंही पाऊल उचलतील असं वाटतं नव्हतं. उलट ते भाजपाच्या विरोधात भूमिका मांडत होते. अचानक काय झालं माहीत नाही. पण भविष्यात जनता त्यांना त्यांच्या या भूमिकेसाठी नक्कीच धडा शिकवेल."

भाजपाच्या विरोधात नितीश कुमारच आघाडी करत होते : इंडिया आघाडीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "दोन-तीन महिन्यांपूर्वीच नितीश कुमार यांनी देशातील भाजपा वगळून इतर पक्षाच्या अध्यक्षांना आणि नेत्यांना पाटणा इथं निमंत्रित केलं होतं. भाजपाला नियंत्रणात ठेवणं गरजेचं असून विरोधकांनी एकजूट करावी, असं त्यांचं मत होतं. तसंच तेव्हा पाटणा इथल्या बैठकीत त्यांनी एक प्रभावी भाषण केलं. विरोधकांची एकजूट कशासाठी केली पाहीजे, त्याची आवश्यकता का आहे? यावरही त्यांनी त्यावेळी भाष्य केलं होतं. त्याप्रमाणे ते कामही करत होते. मात्र मागच्या 15 दिवसांत अचानक काय झाले? याची मला कल्पना नाही. त्यांनी त्यांची विचारधारा का सोडली? विरोधकांचे ऐक्य करत असताना ते ज्या गोष्टी सांगत होते, त्या त्यांनी अचानक का सोडल्या? याबाबत कळायला मार्ग नाही. त्यांनी अचानक भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं."

हेही वाचा :

  1. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  2. अयोध्येत राम, बिहारमध्ये 'पलटूराम'; नितीश कुमारांना राजीनाम्याचा छंद, संजय राऊतांची टीका
  3. 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.