ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - sharad pawar news

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला चांगली टक्कर दिली आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना पहिली प्रतिक्रिया दिली.

sharad pawar news
sharad pawar news (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 3:35 PM IST

Updated : Jun 4, 2024, 5:24 PM IST

शरद पवार यांची पत्रकार परिषद (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई- माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "मंदिर आणि मशिद करून फायदा होत नाही," असा शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीतल्या देशभरातल्या जागांचा कल लक्षात आल्यानंतर एनडीएसह 'इंडिया' आघाडीने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश या राज्यांना सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्त्व आलं आहे. 'इंडिया' आघाडीच्या वतीने सर्व चर्चा करण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार घेतली.

वेळ पडल्यास चर्चा करू- बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत येण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. आघाडीत सहभागी झाल्यास देशाचं उपपंतप्रधानपद सोपवण्याचा प्रस्ताव नितीश कुमार यांना देण्यात आल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत. याबाबत तपशील ठरवण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आपली आतापर्यंत मल्लिकार्जुन खरगे आणि सीताराम येचुरी वगळता कुणाशीही चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. मात्र वेळ पडल्यास चर्चा करू, हे बोलायलाही पवार विसरले नाहीत.

तिन्ही पक्ष मिळून राज्याची सेवा करू- पंतप्रधानपदाबद्दल बोलताना पवार यांनी,"पंतप्रधान कोण होणार किंवा भाजपा कोणाला पुढे करणार, हा आमचा विषय नाही. उद्या काय करावे लागेल याबाबतची चर्चा झाल्यावरच बोलू," अशी सावध प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्रात सर्व मिळून दहा जागांवर लढलो आणि सात जागांवर विजयी झालो. हे फक्त आमच्या पक्षाचे यश नाही तर आघाडीचे यश आहे. आम्ही तिघं (घटकपक्ष) मिळून राज्याची सेवा करू." असं ते म्हणाले.

लोकांची मानसिकता मला माहीतेय-संपू्र्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदार बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. "हे अपेक्षितच होतं. लोकांची मानसिकता मला माहीत आहे. लोक योग्य निर्णय घेतात. खडकवासला सोडून बाकी ठिकाणी आम्हाला बाकी ठिकाणी चांगलं मतदान झालं. हा निकाल प्रेरणादायी आहे. मंदिर-मशिद केल्याने लोक मत देत नाहीत," या शब्दांत त्यांनी मतदारांबद्दलचा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-

  1. अजित पवारांना दे धक्का! सुप्रिया सुळे विजयाच्या उंबरठ्यावर - Baramati Lok Sabha Results
  2. हवेत विरला एनडीएचा ४०० पारचा नारा, महाराष्ट्रासह उत्तप्रदेशमध्ये पिछाडी - Lok Sabha election results 2024
  3. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र - Sharad Pawar On CM Eknath Shinde

Last Updated : Jun 4, 2024, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.