मुंबई Rohit Pawar ED Enquiry : सध्या देशासह राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. मागील पंधरा दिवसात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी करण्यात आली. यानंतर आज पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी करण्यात येणार आहे.
तिसऱ्यांदा चौकशी : आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणावर ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं मागील पंधरा दिवसात रोहित पवार यांची तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आज बोलावण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडं रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरुन विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.
तब्बल नऊ तास झाली होती चौकशी : काही दिवसांपूर्वी ईडीनं बारामती अॅग्रोमधील कथित घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली होती. यानंतर रोहित पवारांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं. दरम्यान, 24 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आमदार रोहित पवार यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांना आज कागदपत्राची पूर्ताता करण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. यानंतर आज रोहित पवार हे तिसऱ्यांदा ईडी चौकशीला सामोरं जाणार आहेत. मागील पंधरा दिवसात विरोधी पक्षाकडून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, तसेच रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा -