ETV Bharat / politics

साताऱ्यात दिसलं शरद पवारांचं 'जेम्स बॉन्ड' कनेक्शन; 'व्हीआयपी' नंबरच्या मर्सिडीजनं वेधलं लक्ष - Sharad Pawar Car Satara Visit

Sharad Pawar Visit Satara : राजकीय नेते आणि त्यांच्या गाडीचा 'व्हीआयपी' नंबर हा विषय नेहमीच कार्यकर्त्यांसाठी कुतुहलाचा असतो. आपल्या नेत्याच्या गाडीचा नंबर हा कार्यकर्त्यांना तोंडपाठ असतो. त्यामुळं कधीकधी ती गाडी सोडून तो नेता जर एखाद्या दुसऱया गाडीनं फिरत असेल तर त्या गाडीचा नंबरसुद्धा लगेच चर्चेचा विषय बनतो. असंच काहीसं घडलंय शरद पवार यांच्यासोबत....

Sharad Pawar Visit Satara
शरद पवार सातारा दौऱ्यावर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 6:39 PM IST

Updated : Sep 22, 2024, 10:47 PM IST

सातारा Sharad Pawar Visit Satara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर असतात, त्यावेळी त्यांची एक खास गाडी स्वागतासाठी तयार असते. मात्र, रविवारी (22 सप्टेंबर) त्यांनी वेगळ्या नंबरच्या गाडीमधुन 'एन्ट्री' केली. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. कोणाची आहे ही गाडी? काय आहे गाडीचा नंबर? वाचा सविस्तर...

शरद पवारांची मर्सिडीतून एन्ट्री : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी रविवारी सातारा येथं भेट दिली. या कार्यक्रमासाठी शरद पवार ज्या गाडीतून आले ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण, शरद पवार 'MH 50 S 0007' क्रमांकाच्या मर्सिडीज कारमधुन आले. या क्रमांकाचा खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी खास संबंध आहे. उदयनराजेंच्या बहुतांश गाड्यांचे क्रमांक '007' आहेत.

शरद पवार सातारा दौऱ्यावर (Source - ETV Bharat Reporter)

कार नेमकी कोणाची? : शरद पवार यांची साताऱ्यातील बालेकिल्ल्यात 007 च्या कारमधून एन्ट्री झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ती कार नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात होता. ती मर्सिडीज कार शरद पवार गटाचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची असल्याचं समोर आलं. पवारांच्या दौऱ्यात आणि तेही साताऱ्यात कराड उत्तरच्या आमदारांनं 007 नंबरचीच कार का आणली? यावर आता चर्चा होतेय.

रेठरे बुद्रुकला राजकीय घडामोडींचा इतिहास : कृष्णाकाठावरील रेठरे बुद्रुक गावाला राजकीय घडामोडींचा मोठा इतिहास आहे. ज्यांना 'रेठऱ्याचा कार्ल मार्क्स' म्हणून ओळखलं जायचं त्या यशवंतराव मोहिते यांच्या रेठरे गावातील कृष्णा कारखान्याच्या अनेक निवडणुका गाजल्या आहेत. 2009 च्या निवडणुकीत कृष्णा कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर झालं आणि अविनाश मोहिते या तरुण नेतृत्वाचा उदय झाला.

हेही वाचा

  1. "श्रीगोंद्यात पक्षाकडून उमेदवारी नाही, प्रत्येक पक्ष ..." संजय राऊतांनी सांगितलं राजकीय गणित - Sanjay Raut news today
  2. "राजकारणात मी जात नाही, कारण माझ्या सवयीमुळे.."नाना पाटेकर यांनी सांगितलं बेधडक कारण - Nana Patekar On Politics
  3. गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - EKNATH SHINDE NEWS

Last Updated : Sep 22, 2024, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.