ETV Bharat / politics

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; राऊत म्हणाले, "पक्ष संपवण्यासाठी मदत..." - Sanjay Raut On PM Narendra Modi

Sanjay Raut On PM Narendra Modi : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. तर संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना, राऊतांना धर्मनिरपक्षतेच्या उलट्या होण्याचं कारण काय? असा सवाल भाजपाकडून केला गेलाय.

sanjay raut reacts over pm narendra modi visits dhananjay chandrachud house
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2024, 1:13 PM IST

मुंबई Sanjay Raut On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायांचं दर्शन घेतलं आणि आरती केली. यावरूनच आता उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले, यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. सरन्यायाधीशाच्या पदावर चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असताना देखील तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातंय असं स्वत: सरन्यायाधीश वारंवार म्हणताता, पण निर्णय होत नाही. आता ते निवृत्तीला आले असताना त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचतात यावरून काय बोध घ्यावा? असंही राऊत म्हणालेत.

पंतप्रधान मोदी संविधानाला धरून आहेत का? : पुढं राऊत म्हणाले की, "खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली तर जात नाही ना? या लोकांच्या मनातील शंका नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनं पक्क्या झाल्या आहेत. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला तसंच प्रोटोकॉलला धरून आहेत का? आतापर्यंत मोदी गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले याची माहिती माझ्याकडं नाही. परंतु, ज्या पद्धतीनं काल पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले. त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आरती केली. हे पाहता धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान असं चित्र पाहायला मिळालं", असा टोला देखील राऊतांनी लगावलाय.

तारखांवर तारखा का देताय? : "पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश असताना महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्याबाबत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? या प्रकरणाबाबत तारखांवर तारखा का देताय? याबाबत शंका आमच्या आणि जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप, परंतु महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणात अवाक्षर काढलं जात नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख. हे सर्व का होतंय?", असा सवाल राऊतांनी केला.

नवीन पायंडा पाडला जातोय : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीबद्दल बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "देशामध्ये नवीन पद्धत, नवीन अजेंडा किंवा नवीन पायंडा भाजपाकडून सातत्यानं पाडला जातोय. 'जो जे वांछील तो ते लाहो'. परंतु गणपती बाप्पांचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळं वेगळ्या अर्थानं मी यावर काही बोलणार नाही." ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणालेत की, "सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या खासगी निवासस्थानी येण्यास मान्यता दिली. हे अतिशय धक्कादायक आहे. यामुळं चुकीचा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो."

संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा : या एकूण प्रकरणावर बोलताना भाजपाचे आमदार अतुल भातखलकर म्हणालेत की, "देशाच्या पंतप्रधानानं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, तर संजय राऊत यांना उलट्या होण्याचं काही कारण नाही. दिल्लीतील औरंगजेबाचं नाव हटवण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय. उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते मुस्लिम मतांसाठी मतांचं राजकारण करत नाहीत. संजय राऊत यांना धर्मनिरपेक्षतेच्या उलट्या होण्याचं कारण काय? यापूर्वीही ते निवडणूक आयोगाबद्दल वाटंल तसं बोलले आहेत. माझी तर मागणी आहे की, न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा."

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi
  2. गृहमंत्री पदावरुन संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; नागपूर प्रकरणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका - Sanjay Raut On Devendra Fadnavis
  3. अजित पवार यांनी आता पश्चाताप करून काय उपयोग - संजय राऊत - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.