पुणे Lok Sabha election 2024 : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली. बारामतीची लढाई ही फक्त शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नसून "महाराष्ट्राच्या अस्मितेची" लढाई आहे. उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारला : खासदार संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी स्वतः औरंगजेब आहेत. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. म्हणून याला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म हा गुजरातला झालाय. मोदी यांच्या गावातील शेजारचं गाव आहे. तिथं औरंगजेब याचा जन्म झाला. त्यामुळे मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. म्हणून ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहे," अशी बोचरी टीका राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.
मोदी यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे : पुरंदर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत खासदार राऊत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, गेल्या एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात 27 वेळा आले. रोज मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रात आहेत. ते मुंबईमध्ये 8 सभा घेणार आहेत. देश वाऱ्यावर सोडून ते महाराष्ट्रात येत आहेत. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या देशातील पंतप्रधान हे खोटे बोलत आहे. इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान या महाराष्ट्राने पाहिले नाही."
बारामतीत अस्मितेची लढाई : "अजित पवार आयत्या बिळावर नागोबा आहेत. शरद पवार शक्तिमान नेते आहेत. दिल्लीला शरद पवारांची कायम भीती वाटत आलीय. अजित पवार जाहीरपणे लोकांना धमक्या देतात. खोटं बोलणारा प्रधानमंत्री देशाला लाभला आहे, हे देशाचं दुर्दैव आहे. हुकूमशाहीचा शेवटचा टोक या देशामध्ये आहे. शिंदे गटाला मी शिवसेना फडणवीस गट असं म्हणतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रे देखील फडणवीस गट झाला आहे. भाजपाला विकास जन्माला घालता आला नाही. म्हणून त्यांनी आधी ठाण्याचा नवरा केला. मग नांदेडचा नंतर आता बारामतीचा नवरा केला. भाजपानं तीन नवरे केले, अशी जोरदार टीका खासदार राऊत यांनी केली.
म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे : यावेळी शरद पवार म्हणाले की, "पुरंदरमधील लोक नेहमी साथ देतात. मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात त्यावर चिंता आहे. भाजपाला 400 पार करण्याचा अर्थ असा आहे की, त्यांना वाटेल ते करायचं आहे. त्यांना संविधान बदलायचे. त्यामुळे त्यांना 400 जागा पाहिजे. त्यांची धोरणे काय आहेत, हे यातून कळतं. त्यामुळं अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे."
हेही वाचा -
- महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW
- "...तर तुम्हाला बारामतीत दूधच विकावं लागलं असतं"; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Sanjay Raut on Ajit Pawar
- "बाकीचं नंतर बोला, आधी बारामतीत..."; पुतण्याचं काकाला थेट आव्हान - Rohit Pawar Challenge Ajit Pawar