ETV Bharat / politics

1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचं घर चालंल का? लाडका भाऊ योजनेवरुन विरोधकांचा हल्लाबोल - Ladka Bhau Yojana - LADKA BHAU YOJANA

Ladka Bhau Yojana : 'लाडकी बहीण' योजनेनंतर महाराष्ट्र सरकारनं 'लाडका भाऊ' योजनेची घोषणा केलीय. मात्र, यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय.

Sanjay Raut and Yashomati Thakur criticized State Government over Ladka Bhau Yojana
यशोमती ठाकूर, एकनाथ शिंदे, संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 2:31 PM IST

मुंबई Ladka Bhau Yojana : राज्य सरकारनं 'लाडकी बहीण' योजनेनंतर आता 'लाडका भाऊ' योजनेची घोषणा केलीय. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात घोषणा केली. अगोदरच लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. असं असतानाच आता लाडका भाऊ योजनेवरून देखील विरोधकांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी लाडका भाऊ योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय.

यशोमती ठाकूर आणि संजय राऊत (ETV Bharat)

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, "राज्यातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण केली. तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही लाडक्या भावाप्रमाणेच पाच हजार रुपये अशी सन्मानजनक रक्कम द्यावी", अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केलीय. तसंच भावा-बहिणींमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्या म्हणाल्यात.

1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचं घर चालेल का : याच मुद्द्यावर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "काल शरद पवार यांनी सांगितल्यानुसार लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर या सरकारला लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ हे सगळं आठवायला लागलय. विरोधकांनी यावर टीका केलेली नाही. मात्र, सरकारी पैशातून एकंदरीत जे राजकारण सुरू आहे, त्यावर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत." त्याचबरोबर, "आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना सहा हजार रुपये. त्यातही पदवीधरांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, पैशांची खरी गरज लाडक्या बहिणींना आहे. त्यामुळं सगळ्या लाडक्या भावांच्या आणि बहिणींच्या खात्यात दहा हजार रुपये टाका. तसंच 1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचं घर चालेल का?", असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. बहिणींपाठोपाठ आता 'भाऊ'ही होणार लाडके, नव्या योजनेनं तिजोरीवर किती पडणार ताण? - Ladka Bhau Scheme
  2. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या घोषणा 'जोमात', योजना मात्र 'कोमात' - Government Scheme

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.