ETV Bharat / politics

"शरद पवारांच्या आशीर्वादानं मंत्रिपद तरीही..."; समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर पुन्हा निशाणा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आज कागल विधानसभा मतदारसंघातून समरजित घाटगे उमेदवारी अर्ज दाखल केला.

Samarjeet Ghatge
समरजित घाटगे, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ (File PHoto)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2024, 3:49 PM IST

कोल्हापूर : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. याच पाश्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक होत आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.

शरद पवार यांची साथ सोडली : "शरद पवारांच्या आशीर्वादामुळं 25 वर्ष मंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारानंतर सर्वाधिक मंत्री पदावर मुश्रीफ यांना संधी मिळाली, असं असतानाही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून दिल्यानं आणि निष्ठा विकल्यानं त्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यामुळं त्यांच्याकडून चुकीच वक्तव्य होत आहेत. अजून 25 दिवस तुम्ही पालकमंत्री आहात. तोपर्यंत संविधानाचा सन्मान करावा अशी विनंती करून, "गुरुदक्षिणा दिल्यानंतर गुरुवर पावशेर ठेवायचं नसतं", गुरुदक्षिणा दिल्याचा उल्लेख करून त्यांनी शरद पवारांचा अपमान केला असा घणाघात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी मंत्री मुश्रीफांवर केला". प्रचंड शक्ती प्रदर्शन करत कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घाटगे पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना समरजित घाटगे (ETV Bharat Reporter)

जनतेने ही निवडणूक हाती घेतली : कोल्हापुरातील कागल- गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. समरजित घाडगे उमेदवारी अर्ज भरत नाही तर कागल, गडहिंग्लज, उत्तूरची जनता ही परिवर्तनासाठी इतक्या वर्षापासून वाट बघत आहेत. ते माझ्या निमित्ताने परिवर्तनाची सुरुवात केली आणि जनतेनेच हा फॉर्म भरला. पुढचा व्यक्ती काय करत आहे याकडं माझं लक्ष नाही. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. माझ्यामागे मतदारसंघातील जनता आणि महाविकास आघाडीचे नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वेळेस हसन मुश्रीफ यांच्या मागे असलेले शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे.

जनतेचा चांगला प्रतिसाद : माझा प्रचार माझी जनता करणार आहे. गेल्या पाच वर्षापासून मी जनतेमध्ये आहे. मला खास वेगळा प्रचार करायची गरज नाही. जनतेचा प्रतिसाद चांगला आहे. आज संध्याकाळी रोहित पवार यांची मुरगुडात सभा होत आहे आणि ते येण्याआधीच सोशल मीडियामध्ये विरोधकांकडून स्टेटमेंट येत आहेत. शरद पवार कागल आणि गडहिंग्लजला दोन सभा घेणार आहेत. मी शरद पवार यांना काहीही मागत नाही. वरूनच कार्यक्रम केला जातं असल्याचा टोलाही घाटगे यांनी लगावला.

शक्तीपीठचा निर्णय घाईगडबडीत : हसन मुश्रीफ यांनी गडबडीत रद्द करण्याचा जीआर काढला. सहा-सात जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जातो. मुश्रीफ हे एवढा बालिशपणा कसा करू शकतात. त्यांनी चुकीचा जीआर काढल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे हे सिद्ध होत आहे. या जीआरमुळं आचारसंहिता भंग झालीय, आचारसंहिता भंग झाल्याची गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही घाटगे यांनी सांगितलं.

मुश्रीफ तुम्ही पळ काढू नका निवडणूक लढावाच : जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांची शरद पवार यांच्यासोबत भेट आणि चर्चाही झाली आहे. त्यांची काय भूमिका आहे हे थोड्याच दिवसात पार्टी मीटिंग घेऊन जाहीर करतील. मात्र, मुश्रीफ तुम्ही निवडणुकीतून माघार घेऊ नका, कागल, गडहिंग्लज, उत्तुरच्या जनतेला परिवर्तनापासून दूर ठेवू नका. तुम्ही इलेक्शन मधून पळ काढू नका. तुम्ही इलेक्शन लढवा याचं उत्तर जनता देणार आहे. जनतेच्या हातातून ही सुवर्णसंधी तुम्ही घालू नका असा आव्हान ही घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांना दिलंय.

हेहा वाचा -

  1. शेकाप-ठाकरे गटातील द्वंद्वामुळं उरणमध्ये भाजपाला बळ? जाणून घ्या राजकीय समीकरण
  2. समीर भुजबळ नांदगावमधून निवडणूक लढणार, छगन भुजबळ म्हणाले," अजून मला कळत नाही..."
  3. 'राज'पुत्रा समोर दुहेरी आव्हान, माहीम विधानसभेत अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार रिंगणात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.