ETV Bharat / politics

'महाराष्ट्र आता नव्या क्रांतीसाठी तयार झाला'; 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पाटलांचा हल्लाबोल

Rohit Patil on Sharad Pawar Tutari symbol : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या चिन्हासह महाराष्ट्रात लोकांसमोर जात असला तरी महाराष्ट्राला शरद पवार हे ठाऊक आहेत. महाराष्ट्र आता नव्या क्रांतीसाठी तयार झाला आहे आणि शरद पवार हेच आमचे चिन्ह आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत केलेल्या कामाला महाराष्ट्र जाणतोच," अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली.

Rohit Patil on Sharad Pawar
शरद पवार आणि रोहित पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 3:10 PM IST

प्रतिक्रिया देताना रोहित पाटील

मुंबई Rohit Patil on Sharad Pawar Tutari symbol : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला 'तुतारी' हे चिन्ह मिळालं आहे. 'तुतारी' हे चिन्ह महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचणार का? या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आरआर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शरद पवार यांना नवीन चिन्ह घेऊन लढणं ही गोष्ट नवीन आहे. महाराष्ट्राला शरद पवार हे माहीत आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत केलेल्या विविध कामांच्या रुपानं ते महाराष्ट्रात या आधीच पोहोचले आहेत. त्यामुळं आमच्यासाठी शरद पवार हे चिन्ह असणार आहेत," असं रोहित पवार यांनी सांगितलं.

कृषिमंत्री असताना पवारांनी घेतलेल्या निर्णयांची पुन्हा मागणी : "सध्या शेतकऱ्यांचं जे अतिशय उग्र आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनातील जर आपण मागण्या पाहिल्या तर शरद पवार कृषिमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांच्या मागण्या या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. ते निर्णय पुन्हा घेतले जावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. म्हणजेच शरद पवार यांचे दूरगामी विचार आणि त्यांची निर्णय क्षमता ही यापूर्वी महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलेली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत," असल्याचंही रोहित पाटील यांनी सांगितलं.

जनतेचा रोष व्यक्त होईल : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार घराणे समोरासमोर आल्यास काय चित्र असेल? यावर रोहित पाटील म्हणाले की, "आता कोण कोणाविरुद्ध लढते आहे, त्यानं काही फरक पडणार नाही. लोकशाहीची हत्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं होताना लोक पाहत आहेत. जनता आता आपला रोष जाहीररित्या जरी व्यक्त करीत नसली तरी, येत्या निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच बदल घडेल आणि महाराष्ट्रात नवी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हरवला : "महाराष्ट्रामध्ये नेहमीच सुसंस्कृत आणि पुरोगामी राजकारण केलं गेलं. महाराष्ट्रानं राजकारणाची पातळी कधीही घालू दिली नव्हती. मात्र गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचा हा सुसंस्कृतपणा हरवला आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यासारख्या सुसंस्कृत नेत्यांची परंपरा लाभली आहे. मात्र अलीकडं राजकारणामध्ये गचाळपणा आला असून राजकारणाचा स्तर खालावला आहे. जनता आगामी निवडणुकांमध्ये अशा सर्व लोकांना धडा शिकवून पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहील," असा विश्वासही रोहित पाटील यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. Rohit Pawar : रोहित पवार यांनी शंभू महादेवाला घातलं साकडं, तर शंभर मुलांनी काढलं रोहित पवारांचे चित्र, पाहा व्हिडिओ
  2. Rohit Patil on Rebel MLA : पाठपुरावा केला तर कामे होतात - रोहित पाटील यांचा बंडखोर आमदारांना टोला
  3. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नवीन चिन्हावर रणशिंग फुंकणार; महाराष्ट्रात तुतारी वाजणार का? काय आहेत शक्यता?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.