मुंबई : महाराष्ट्रात सत्तेची चावी कोणाच्या हाती असणार? याचा निकाल लागायला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी राज्यात कुणाची सत्ता येणार? यावर अद्यापही अनेक तर्क वितर्क सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची मात्र बंडखोरांच्या हाती असल्याचं चित्र आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी तब्बल 63 जागांवर बंडखोरांनी 'काटे की टक्कर' दिली असल्यानं राज्याच्या सत्ताबाजारात बंडखोरांचा भाव वधारला आहे.
जादुई आकडा कोणाला भेटेल? : राज्यात विधानसभेच्या एकूण 288 पैकी सत्ता स्थापनेसाठी लागणारा 145 चा जादुई आकडा कोणाला भेटेल? यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. परंतु राज्यात तब्बल महत्त्वाच्या 63 जागांवर बंडखोरांनी 'काटे की टक्कर' दिल्यानं सत्ता स्थापनेसाठी बंडखोर महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. राज्यात महायुतीत भाजप 148 जागा, शिवसेना 83 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 52 जगांवर उमेदवार उभे केले आहेत. यापैकी 31 जागांवर बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून 7 जागांवर अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हे एकाच पक्षाचे आहेत. त्यातच अशा एकूण 15 जागा आहेत, जिथे अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हे महाविकास आघाडीच्या पक्ष्यांशी संबंधित आहेत.
शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात भाजपाचे 5 बंडखोर रिंगणात
अक्कलकुवा
आमशा पाडवी (शिवसेना)
हिना गावित (भाजप बंडखोर)
पाचोरा
किशोर पाटील (शिवसेना)
अमोल शिंदे (भाजप बंडखोर)
नांदेड दक्षिण
आनंद पाटील (शिवसेना) संजय घोगरे (भाजपा)
सावंतवाडी
दीपक केसरकर (शिवसेना) विशाल परब (भाजपा बंडखोर)
अलिबाग
महेंद्र दळवी (शिवसेना) दिलीप भोईर (भाजपा बंडखोर)
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपाचे 6 बंडखोर रिंगणात
अमळनेर
अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरीष चौधरी (भाजपा बंडखोर)
अमरावती
सुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)
जगदीश गुप्ता (भाजप बंडखोर)
अहेरी
धर्मराव आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस)
अंबरीशराव आत्राम (भाजपा बंडखोर)
जुन्नर
अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशाताई बुचाके (भाजपा बंडखोर)
अकोला
किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वैभव पिचड (भाजपा बंडखोर)
भाजपा विरोधात शिवसेनेचे 5 बंडखोर रिंगणात
फुलंब्री
अनुराधा गायकवाड (भाजपा) रमेश पवार (शिवसेना)
विक्रमगड
हरिश्चंद्र भोये (भाजपा)
प्रकाश निकम (शिवसेना)
कल्याण पूर्व
सुलभा गायकवाड (भाजपा) महेश गायकवाड (शिवसेना)
ऐरोली
गणेश नाईक (भाजपा)
विजय चौगुले (शिवसेना)
बेलापूर
मंदा म्हात्रे (भाजपा)
विजय नाहटा (शिवसेना)
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेनेचे 3 बंडखोर रिंगणात
देवळाली
सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
राजश्री अहिरराव (शिवसेना)
मानखुर्द - शिवाजीनगर
नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
सुरेश पाटील (शिवसेना)
अहमदनगर शहर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
शशिकांत गाडे (शिवसेना)
भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस 2 बंडखोर रिंगणात
मोर्शी
उमेश यावलकर (भाजप), देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
काटोल
चरणसिंह ठाकुर (भाजप), अनिल शंकरराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
शिवसेना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 बंडखोर रिंगणात
नांदगाव
सुहास कांदे (शिवसेना) समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
कर्जत
महेंद्र थोरवे (शिवसेना)
सुधाकर घारे (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
पुरंदर
विजय शिवतारे (शिवसेना)
संभाजी झेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 103, शिवसेना (उबाठा) 96 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 87 जागांवर निवडणूक लढवत आहे. यापैकी 32 जागांवर महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अशात एकूण 17 जागांवर अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हे एकाच पक्षाचे आहेत. यातच अशा एकंदरीत 15 जागा आहेत ज्या ठिकाणी अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हा महाविकास आघाडीच्या विविध पक्षांशी संबंधित आहे.
शिवसेना (उबाठा) विरोधात काँग्रेसचे 5 बंडखोर रिंगणात
रामटेक
विशाल बरबटे शिवसेना (उबाठा)
राजेंद्र मुळक (काँग्रेस बंडखोर)
परतूर
बबनराव लोणीकर शिवसेना (उबाठा)
सुरेश कुमार जेथलिया (काँग्रेस बंडखोर)
कोपरी पाचपखाडी
केदार दिघे शिवसेना (उबाठा)
मनोज शिंदे (काँग्रेस बंडखोर)
सोलापूर दक्षिण
अमर पाटील शिवसेना (उबाठा), धर्मराज काडादी (काँग्रेस बंडखोर)
राजापूर
राजन साळवी शिवसेना (उबाठा), अविनाश लाड (काँग्रेस बंडखोर)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) विरोधात काँग्रेसचे 5 बंडखोर रिंगणात
शिंदखेडा
संदीप बेडसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शामकांत सनेर (काँग्रेस बंडखोर)
नागपूर पूर्व
दुनेश्वर पेठे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस बंडखोर)
पर्वती
अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
आबा बागुल (काँग्रेस बंडखोर)
काटोल
सलील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
याज्ञवल्लक्य जिचकार (काँग्रेस बंडखोर)
अहमदनगर शहर
अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
मंगल भुजबळ (काँग्रेस बंडखोर)
काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) बंडखोर
पाथरी
सुरेश वरपूडकर (काँग्रेस)
बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) बंडखोर)
शिवसेना (उबाठा) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) बंडखोर
पाटण
हर्षद कदम शिवसेना (उबाठा)
सत्यजित पाटणकर (शरद पवार बंडखोर)
काँग्रेस विरोधात शिवसेनेचा (उबाठा) उमेदवार
इगतपुरी
लकी भाऊ जाधव (काँग्रेस)
निर्मला गावित (उबाठा बंडखोर)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) विरोधात शिवसेनेचा (उबाठा) उमेदवार
घनसावंगी
राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
शिवाजीराव चोथे शिवसेना (उबाठा)
शहापूर
दौलत दरोदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
अविनाश शिंगे ( शिवसेना (उबाठा) बंडखोर)
हेही वाचा