ETV Bharat / politics

शिंदे गटात लेट एन्ट्री घेणाऱ्या रवींद्र वायकर यांना लोकसभा उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढणार - Lok Sabha Election 2024

Mumbai North West Lok Sabha Constituency : महायुतीकडून शिंदे गटानं रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात वायकर यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार असून त्यामुळं या मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळेल.

Ravindra Waikar nomination announced by Shivsena Shinde Group from Mumbai North West Lok Sabha
शिंदे गटात लेट एन्ट्री घेणाऱ्या रवींद्र वायकर यांना लोकसभा उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढणार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 4:00 PM IST

मुंबई Mumbai North West Lok Sabha Constituency : महायुतीतील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं येथे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे.

गजानन कीर्तिकर यांची माघार : याआधी या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी ठाकरेंनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तिकरांनी निवडणुकीतून माघार घेतली. गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा झाली. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे.

कोण आहे रवींद्र वायकर? : मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून रवींद्र वायकर यांनी 20 वर्ष काम पाहिलंय. मुंबई मधील जोगेश्वरीमधून 1992 साली ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 2006 ते 2010 पर्यंताच्या कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. त्यानंतर जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून ते सलग 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. राज्यात 2014 साली भाजपा शिवसेनेची युती असताना त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. 2019 साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ते गृहनिर्माण विभागाच्या राज्यमंत्री पदी विराजमान झाले होते.

ईडी चौकशीमुळं शिंदेंच्या सेनेत? : कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू होती. वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथील क्लबच्या जागेचा गैरवापर करून तिथं हॉटेल बांधताना सत्य लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला होता. असं असतानाच वायकर यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ईडी चौकशी मागे लागल्यामुळं त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला.

हेही वाचा -

  1. मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार का? गजानन किर्तीकरांनी थेटच सांगितलं... - Gajanan Kirtikar
  2. "शिवसेना शिंदे गटाकडून तिकिट देण्याचं आश्वासन देऊनही मुलानं ऐकलं नाही, म्हणून..." गजानन कीर्तिकर यांचा गौप्यस्फोट - lok Sabha election 2024
  3. अमोल कीर्तिकरांची सात तास ईडी चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी - Kirtikar Supporters Slogans

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.