ETV Bharat / politics

"ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज - EVM HACKING

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या दाव्यावर भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं.

RAOSAHEB DANVE CHALLENGE
रावसाहेब दानवे, महादेव जानकर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 4:59 PM IST

Updated : Nov 30, 2024, 5:20 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. निवडणुकीत मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं विरोधकांकडून वारंवार ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत खळबळजनक दावा केला होता. "ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे, त्यामुळं मला सगळं माहिती आहे," असं महादेव जानकर म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजपाचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

महादेव जानकर यांना ओपन चॅलेंज : महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्यावर रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देत, महादेव जानकर यांना चॅलेंज दिलं आहे."महादेव जानकर माझे मित्र चांगले आहेत. महादेव जानकर किंवा इतर कोणी मोठे इंजिनिअर असतील, तर त्यांनी ईव्हीएम हॅक होतं, हे सिद्ध करून दाखवावं," असं ओपन चॅलेंज रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

कुठलाही वाद नाही : रावसाहेब दानवे पुढं म्हणाले, "जेव्हा तीन पक्षांच सरकार बनतं, तेव्हा समन्वय असणं आवश्यक असतं. तो समन्वय आमच्यात आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आमच्या पक्षात याबाबत कुठलाही वाद नाही. आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असणार आहे. शपथविधीबाबत निश्चित तारीख अद्याप पक्ष श्रेष्ठींनी आम्हाला कळवली नाही. तसंच खाते वाटप, नेता निवडीवरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत."

आम्ही आक्षेप घेतला नाही : "आम्ही हिमाचलमध्ये निवडणूक हरलो, तेव्हा कोणीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. ईव्हीएम हॅक करता येत, असेल तर जाहीररीत्या हॅक करून दाखवा. जेव्हा जनता त्यांना नाकारते आणि आमच्या बाजूनं जनादेश देते, तेव्हा विरोधक आक्षेप घेतात," असा आरोपही दानवे यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा

  1. मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यांवरून अडलंय घोडं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवीत 'ही' खाती
  2. राज्यातील अनेक पराभूत उमेदवारांची व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी, काही उमेदवारांनी भरले शुल्क
  3. बहुमत असताना सुद्धा राज्याला मुख्यमंत्री का मिळत नाही? संजय राऊत यांचा सवाल

Last Updated : Nov 30, 2024, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.