ETV Bharat / politics

राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्षपदाच्या रिंगणात? सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता - RAHUL NARWEKAR

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले कालिदास कोळंबकर यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली.

Rahul Narvekar
राहुल नार्वेकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 6:31 PM IST

मुंबई : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाचे कुलाबा मतदारसंघातील आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे, असं झाल्यास ते रविवारी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील.

2022 मध्ये पहिल्यांदाच सांभाळली अध्यक्षपदाची धुरा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी अध्यक्षपदी काम केलं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडं अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार २०२२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड झाली होती.

सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा : कोळंबकर यांनी विधानसभेवर निवड झालेल्या राज्यातील नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मुनगंटीवार यांनी ही चर्चा कुणी सुरू केली त्याचं नाव सांगा, माझं नाव या चर्चेत नाही अशी सारवासारव केली. रविवारी दुपारपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत असून आपण रविवारी मुंबईत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

"आतापर्यंत पक्षाने न मागता मला पुष्कळ काही दिलं आहे. त्यामुळं यापुढे देखील पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारण्यास तयार आहे." - राहुल नार्वेकर

सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष : राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. नार्वेकरांची २०२२ मध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळं एकाचवेळी सासरे आणि जावई दोन्ही जण विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीला धक्का; अबू आझमी मविआमधून बाहेर, विरोधकांना न जुमानता घेतली शपथ
  2. महायुतीत मंत्रिपदासाठी इच्छुकांची मनधरणी करणं हे देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान?
  3. मला कुठलीही क्लीनचिट नाही, तो सर्वस्वी न्यायालयाचा निर्णय आहे, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.