ETV Bharat / politics

महाराष्ट्रातील 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले-राहुल गांधी - RAHUL GANDHI NEWS

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धारावी प्रकल्पावरून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Rahul Gandhi Press
राहुल गांधी पत्रकार परिषद (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 12:33 PM IST

Updated : Nov 18, 2024, 2:17 PM IST

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातून गुजरातला गेलेले प्रकल्प, धारावी पुनर्वसन विकास प्रकल्प आदी मुद्द्यांवरून भाजपावर जोरदार टीका केली. राहुल गांधी भाजपावर हल्लाबोल करताना म्हणाले, " राज्यातील 8 प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. त्यामुळे संभाव्य 5 लाख रोजगार हिरावले गेलेत. 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. राज्याचे सरकार अदानीसाठी काम करत आहेत". ते मुंबईतील वांद्रे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमधील प्रचारसभेत "एक है तो सेफ है"ची घोषणा केली होती. यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, " एक है तो सेफ है, ही मोदींची मोदींची घोषणा अगदी योग्य आहे. मोदी आणि अदानी एक आहेत. अदानी सेफ आहेत," असा त्याचा अर्थ आहे. "ती घोषणा अदानींसाठी आहे," टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लगावला.

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद (Source- ETV Bharat Repoter)

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून टीका- " धारावी आणि मुंबईतील जमीन बळकावण्यासाठी मोदी आणि अदानी एक आहेत. अदानी यांना धारावी देऊन याद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगाचे देशातील केंद्र संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू," अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली. "धारावीच्या जमीनीवर तेथील स्थानिकांची मालकी आहे. एका व्यक्तीसाठी धारावीच्या जमिनीची चोरी आहे," असा त्यांनी गंभीर आरोप केला.

अदानींचा मुंबई बळकावण्याचा प्रयत्न-मोदींच्या घोषणेवरून टीका करताना राहुल गांधी यांनी सेफ लॉकर आणले. त्यामधून मोदी आणि अदानींचे छायाचित्र, धारावीतील जमीन याचे छायाचित्र बाहेर काढले. राहुल गांधी म्हणाले, "अदानी यांनाच विमानतळे, बंदरे आणि धारावी प्रकल्प सर्व कसे मिळतात? कारण अदानी आणि मोदींचे जुने संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सहकार्याशिवाय अदानींना धारावी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. अदानींचा मुंबई बळकावण्याचा प्रयत्न आहे".

Rahul Gandhi  criticizes BJP
पत्रकार परिषदेत राहुल गांधी (Source- ETV Bharat Reporter)

सरकार अदानीसाठी काम करते- "ईडी, सीबीआयचा कसा वापर होतो? अदानींना कंत्राट कसे मिळतात? त्यामध्ये मोदी किती सहकार्य करतात हे सर्वांना माहित असल्याचे गांधी म्हणाले. धारावीतील स्थानिकांच्या हिताला महत्त्व देऊन आम्ही पुनर्विकास करू ," असे आश्वासन देतानाच मुंबईतील पूर, मँनग्रोव्ह हा महत्त्वाचा मुद्दा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "राज्याचे सरकार अदानीसाठी काम करते. राज्यातील तरुणांचे भविष्य अदानी यांनी चोरले आहे, तरुणांनी याकडे लक्ष द्यावे," असे आवाहन राहुल गांधींनी केले.

  • दिशाभूल करण्याचा प्रयत्न- "मुख्य मुद्दा रोजगाराचा असताना भाजपा धार्मिक मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धारावी, मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांचे हक्कांचे जतन करणार आहोत. आमचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

विचारधारेची निवडणूक आहे-पुढे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारेची निवडणूक आहे. ही निवडणूक 1 ते 2 अब्जाधीश आणि गरीब यांच्यातील निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईची जमीन ताब्यात घ्यायची आहे. अंदाजानुसार एका अब्जाधीशाला 1 लाख कोटी देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार आणि तरुणांना मदतीची गरज असल्याची आमची विचारसरणी आहे. आम्ही प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आहोत. महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. सोयाबीनसाठी 7,000 रुपये प्रति क्विंटल देण्यात येणार आहेत. आम्ही तेलंगणा, कर्नाटकमध्ये जात जनगणना केली आहे. ती जातगणना महाराष्ट्रात करून घेणार आहोत."

  • पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा, अविनाश पांडे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आणि आरिफ नसीम खान उपस्थित होते.

हेही वाचा-

  1. नागपुरात राहुल गांधींनी बनवले तर्री पोहे अन् मारला ताव; पाहा फोटो
  2. "गरिबांना 25 लाखांचा आरोग्य विमा, महिलांना मोफत प्रवासासह..."; राहुल गांधींकडून घोषणांचा पाऊस
  3. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; यशोमती ठाकूर म्हणाल्या, "खोके घेऊन जाणाऱ्या..."

Last Updated : Nov 18, 2024, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.