ठाणे Rahul Gandhi : कोरोना काळात व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरुपात घेतले, असा घनाघाती आरोप कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत केलाय. तसंच या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्यातील सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केलाय. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात दाखल झाली, यावेळी त्यांनी मोदींवर टीका केलीय.
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेठ्या संख्येनं उपस्थित : ठाण्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याया यात्रेचा झंजावात पाहायला मिळालाय. खारेगाव पासून मुंब्रा संपूर्ण परिसरामध्ये या भारत जोडो न्याय यात्रेचा मोठा जल्लोष रस्त्यावर पाहायला मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाले होते. रस्त्यात वेगवेगळ्या ठिकाणी थांबून राहुल गांधी लोकांना अभिवादन करत उमऱ्यावरुन कळवा नाका मार्गे चिंतामणी चौकात पोहोचले चिंतामणी चौकात त्यांनी सभा घेतली आणि या ठिकाणी केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केलेत.
मोंदींवर गंभीर आरोप : याठिकाणी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कोविड काळात व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीकडून मोदींनी हप्ता घेतला. त्याच पैशातून राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तोडली. ते आमदार फ्रीमध्ये पळाले नाही हप्त्याचे पैसे त्यांना दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केलाय. मोदी आणि अदाणी काही वेगळे नाहीत, मोदी म्हणजेच अदाणी आणि अदाणी म्हणणेच मोदाणी, अशी टिकाही राहुल गांधींनी केलीय.
इलोक्टोरल बाँड हे जगातील सर्वात मोठं हप्तावसुली रॅकेट : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करुन इलेक्टोरल बाँड पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजलीय. इलोक्टोरल बाँड हे जगातील सर्वात मोठं हप्तावसुली रॅकेट असून सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली जात आहे. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला होता.
हेही वाचा :