पालघर Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 62वा दिवस असून ही यात्रा गेल्या तीन दिवसांपासून राज्यात आहे. आज या यात्रेला सकाळी 9 वाजता पालघर जिल्ह्यातील मोखाडा सुरुवात झालीय. गुरुवारी राहुल गांधी यांनी नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर टीका केली होती. आजच्या सभेत राहुल गांधी कोण काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Live updates
- गरीब, शेतकरी, लहान व्यापारी व कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडलाचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
वाडा इथं साधणार संवाद : भारत जोडो न्यायाय यात्रेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा इथून सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड याठिकाणी यात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता वाडा इथं यात्रेचं स्वागत करण्यात येईल. तसंच तिथं राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसंच वाडा इथं दुपारचं जेवणही करण्यात येणार आहे. त्यानंतर वाड्यातील कुडुस इथून यात्रेला दुपारी पुन्हा सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी : पालघर जिल्ह्यातून ही यात्रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात प्रवेश करणार आहे. ठाण्यात प्रवेश केल्यानंतर आंबडी इथं कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 च्या सुमारास ही यात्रा ठाण्यातील भिवंडीत दाखल होईल. याठिकाणी स्वागत झाल्यानंतर राहुल गांधी हे लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ठाण्यातील सोनाले मैदानावर या यात्रेचा मुक्काम असणार आहे.
13 राज्यांचा प्रवास केल्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात : 14 जानेवारीला मणिपुरच्या इंफाळ इथून या यात्रेला सुरुवात झाली होती. ही भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यांमधून प्रवास केल्यानंतर आता महाराष्ट्रात दाखल झालीय. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतील असून 6200 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे.
पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश लागू- खासदार राहुल गांधी व माजी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे. अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदीर परिसर, नदीनाका शेलार तसेच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी लागू केले आहेत.
हेही वाचा :