ETV Bharat / politics

ठाणे लोकसभा कोण लढवणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक - Thane Lok Sabha constituency

Pratap Sarnaik News : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं आहे. तसंच नाशिकमधून हेमंत गोडसे लढले तर नक्कीच प्रचंड मताधिक्यानं जिंकून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Pratap Sarnaik reaction on who will be the candidate for Thane Lok Sabha constituency
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 10:58 PM IST

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक

ठाणे Pratap Sarnaik News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, असं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही ठिकाणच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. असं असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत असल्याचं बघायला मिळतंय. यावरच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक : यासंदर्भात आज (1 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना प्रताप सरनाईक म्हणाले की, "या जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय सर्वांसाठीच बंधनकारक असेल. तसंच कोणताही उमेदवार असला तरी त्याला मोठ्या मताधिक्यानं आम्ही निवडून आणू", असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला.

हेमंत गोडसेंविषयी काय म्हणाले : पुढं ते म्हणाले की,"नाशिकची जागा आमचीच असून सर्व्हेवर अवलंबून राहिलो, तर कार्यकर्त्यांची गरज काय?'", असा सवाल त्यांनी केला. तसंच सर्व्हे बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये असून हेमंत गोडसे तेथून लढले तर नक्कीच प्रचंड मताधिक्यानं जिंकून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परंतु, या जागेविषयीचा तोडगा सर्वांच्या एकमतानेच काढला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जागांची अदलाबदली करायला तो व्यापार नसून सर्वांनी थोडा समजूतदारपणा दाखवावा, असंही ते म्हणाले.

विजय शिवतारे संदर्भातही दिली प्रतिक्रिया : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात विचारण्यात आलं असता सरनाईक म्हणाले की, "जे काही झालं ते चुकीचं होतं. मात्र, आपल्यामुळं शिंदे साहेब अडचणीत येणार असतील तर आपण माघार घेऊ असं शिवतारे म्हणाले होते, आणि त्यातच सर्व काही आलंय", असं सरनाईक म्हणाले.

हेही वाचा -

  1. "ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप
  2. BJP Loksabha Election : ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची तयारी सुरू; 'या' नावांची चर्चा
  3. Maharashtra Politics: भाजपबरोबरील लोकसभेच्या जागेच्या तिढ्यानंतर वादग्रस्त जाहिरात, खासदार एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.