ETV Bharat / politics

"विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार", प्रकाश आंबेडकरांचा दावा - PRAKASH AMBEDKAR HEALTH UPDATE

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर आलीय.

Prakash Ambedkar says OBC reservation will be stopped after assembly elections
प्रकाश आंबेडकर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 1:39 PM IST

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR HEALTH UPDATE) हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शुक्रवारी (1 नोव्हेंबर) अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून वैद्यकीय तज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तर असं असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिलीय. तसंच यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? : प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी सध्या आयसीयूमध्ये असून अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्यात. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलंय. निवडणुकीला देखील सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण, विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे. तर एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. "

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (ETV Bharat Reporter)

...तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येणार : पुढं ते म्हणाले, "या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. त्यामुळं आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपलं अमूल्य मत देऊन विजयी करावं”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात दाखल
  2. शरद पवारांनी दाऊदला भेटल्याचा खुलासा करावा, ॲड. प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
  3. प्रकाश आंबेडकर यांचा तिसऱ्या आघाडीत समावेश का झाला नाही? जाणून घ्या, राजकीय कारणे - Tisari Aghadi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.