बेळगाव Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बेळगाव येथे प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, "काँग्रेसचे राजपुत्र म्हणतात की, भारतातील राजे जुलमी होते. त्यांनी आपल्या इच्छेनुसार गरिबांची मालमत्ता हिसकावून घेतली. काँग्रेसच्या राजपुत्रानं महान व्यक्तींचा अपमान केलाय."
छत्रपती शिवाजी महाराज यांची देशभक्ती : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चिनम्मा यांचे सुशासन आणि देशभक्ती आजही आपल्याला प्रेरणा देते. राजपुत्राला म्हैसूरच्या राजघराण्याचं योगदान माहीत नाही का? नवाब, निजाम, सुलतान आणि बादशहांनी केलेल्या अत्याचाराबाबत राजपुत्र (राहुल गांधी) एक शब्दही उच्चारत नाहीत. आमची हजारो मंदिरे उद्धवस्त करणाऱ्या औरंगजेबानं केलेला अत्याचार काँग्रेसला आठवत नाही. औरंगजेबाचं गुणगाण करणाऱ्या पक्षांशी काँग्रेसची राजकीय युती झाली. औरंगजेबानं आमची तीर्थक्षेत्रे नष्ट केली. त्यांची लूट केली. आमच्या लोकांना मारलं? त्या सर्वांबद्दल ते का बोलत नाहीत?"
- मोदी यांचा हॉटेलमध्ये मुक्काम : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी रात्री येथे बेळगाव येथे पोहोचले. त्यांनी आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये मुक्काम केला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.
पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बेळगावमध्ये राहिले : पंतप्रधान पहिल्यांदाच बेळगावमध्ये राहिले आहेत. त्यांच्यासाठी विशेषतः उत्तर कर्नाटक पद्धतीची ज्वारीची भाकरी तयार करण्यात आली होती. बेळगाव परिषदेनंतर पंतप्रधान मोदी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे जाहीर परिषदेत सहभागी होणार आहेत. यानंतर ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यानंतर दावणगेरे शहरातील हायस्कूल मैदानावर आयोजित परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. तर भाजपाच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वर दावणगेरे आणि हावेरीचे उमेदवार बसवराज बोम्मई देखील येथून प्रचार करणार आहेत.
मतदान करण्याचं करणार आवाहन : पंतप्रधान 28 एप्रिल रोजी रात्री कर्नाटकमध्ये मुक्काम करणार आहेत. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बागलकोट येथे आयोजित सभेत ते सहभागी होणार असून जनतेला भाजपाच्या बाजूनं मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. पंतप्रधान मोदी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कर्नाटकमधून मोठं यश मिळावं, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा -
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स मैदानावर 29 एप्रिलला 'महाविजय संकल्प सभा', बारामतीसह तीन लोकसभेत महायुतीचं कमळ फुलणार का? - Lok Sabha Election 2024
- राखी सावंतनं सलमान खानसाठी पीएम मोदींकडे केलं आवाहन, सर्व वर्गातील सुरक्षाची केली मागणी - rakhi sawant
- 'तुमचं नमो नमो चालते, पण जय भवानी नाही'; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले 'तुमचं हिंदुत्व नकली' - Sanjay Raut Attack On Pm Modi