ETV Bharat / politics

राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरताच भाजपाच्या नेत्यांचा निशाणा, म्हणाले... - Rahul Gandhi - RAHUL GANDHI

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई सोनिया गांधी, प्रियांका गांधा वड्रा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. रायबरेलीमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांनी अमेठीमधून अर्ज न भरता रायबरेलीमधून अर्ज भरल्यानं त्यांच्यावर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी टीका केली.

Rahul Gandhi Raebareli
Rahul Gandhi Raebareli (Etv Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 4:12 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. ते पश्चिम बंगालमधील बर्धमान शहरातील भव्य सभेत बोलत होते. "घाबरू नका. पळ काढू नका," असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " काँग्रेसच्या राजकुमाराला खूप भीती वाटली. त्यामुळे त्यानं अमेठीतून पळ काढला. आता राजकुमार हा रायबरेलीत नव्या संधी शोधत आहे. काँग्रेसच्या सर्वात वरिष्ठ नेत्याला लोकसभेत पराभवाची भीती होती. त्यामुळे त्यांनी ( सोनिया गांधी) राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून येण्याचा पर्याय निवडला. राजपुत्राचा वायनाडमध्ये पराभव होत असल्याचं आधीच म्हटलं आहे. आणखी तिसऱ्या मतदारसंघाचा राजपुत्र शोध घेतील. अमेठी हा सुरक्षित मतदारसंघ नसतानाही त्याच्या सहकारी आणि निष्ठावंतांना तेथून राजपुत्र निवडणूक लढवेल, अशी आशा होती. मात्र, तो भीतीन पळून रायबरेलीकडं वळाला. हे लोक इतरांना घाबरू नका, असं सांगतात. त्यांना आज मी मनापासून सांगतो, घाबरू नका. पळू नका." यावेळी मोदी यांनी विविध मुद्द्यांवरून इंडिया आघाडीसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे लोक जिंकण्यासाठी नव्हे तर देशाची तुकडे करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचा पंतप्रधान मोदींनी आरोप केला.

लाँचिग यशस्वी झाले नाही-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकमधील हुक्केरी येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना अनेकवेळा लाँच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यांचा हा एकविसावा प्रयत्न होता. पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयान मोहिमेचा एकवेळा प्रयत्न केला. ते यशस्वी झाले. सोनिया गांधींनी त्यांचे राहुल बाबा नावाचे यान लाँच करण्याचा 21 वेळा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे लाँचिग यशस्वी झाले नाही. आता, ते अमेठीमधून पळ काढत रायबरेलीमधून एकविसाव्या वेळी प्रयत्न करत आहेत. राहुल बाबा, मी तुम्हाला रायबरेलीचा निकाल सांगत आहे. भाजपा उमेदवार दिनेश प्रतास सिंह यांच्याकडून तुमचा मोठ्या फरकानं पराभव होईल. माझे शब्द लिहून ठेवा."

जे युद्धभूमीतून पळ काढतात, ते देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढविण्याची काँग्रेसच्या अनेक नेत्यांना इच्छा होती. मात्र, त्यांनी पळ काढायचा पर्याय निवडला- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

रायबरेली मतदारसंघाचा काय आहे इतिहास? सोनिया गांधी या उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून गेली 20 वर्षे निवडून येत आहेत. याच मतदारसंघातून इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी निवडणूक लढवून जिंकले होते. रायबरेली मतदारसंघानं आजवर गांधी-नेहरू कुटुंबाच्या उमदेवाराला नेहमीच साथ दिली आहे. लोकसभा 2024 मध्ये गांधी कुटुंबाच्या जवळचे असलेले किशोरीलाल शर्मा हे अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवित आहेत. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमदेवारी भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून अचानक उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवित आहेत. केंद्रीय मंत्री तथा भाजपाच्या वरिष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव केला होता. तर राहुल हे केरळमधील वायनाड या मतदारसंघामधून विजयी झाले होते.

हेही वाचा-

  1. लोकसभा निवडणूक 2024 : राहुल गांधी लढणार रायबरेलीतून, तर अमेठीतून 'या' नावावर शिक्कामोर्तब - Lok Sabha Election 2024
  2. "पंतप्रधान मोदी अब्जाधीशांसाठी काम करतात, तर पटनायक...", राहुल गांधींचा हल्लाबोल - Rahul Gandhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.