ETV Bharat / politics

पितृपक्षातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, पितृपक्षाचा आमच्याशी संबंध नाही - काँग्रेसची प्रतिक्रिया - Maharashtra Politics

Maharashtra Politics : गेल्या दोन दिवसांपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली असून पितृपक्षात चांगल्या गोष्टी अथवा चांगले निर्णय घेतले जात नाहीत. मात्र, यंदा पितृपक्ष असतानाही राजकीय पक्षांच्या बैठकांना उधाण आल्याचं चित्र आहे. याबाबत राजकीय पक्षांच्या नेमक्या काय भूमिका आहे जाणून घेऊ.

Maharashtra Politics
राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 8:29 PM IST

मुंबई Maharashtra Politics : गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, असं म्हटलं जातं. राजकारणी देखील याचं तंतोतंत पालन करतात. मात्र, पितृपक्ष सुरू असतानाही राज्यातील सत्तेच्या समीकरणासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडून जागावाटप संदर्भात सातत्यानं बैठका सुरू आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही बच्चू कडू, वामनराव चटप, राजू शेट्टी या नेत्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरूय. त्यामुळं यंदा पितृपक्षातही राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

चर्चा आधीपासूनच सुरू : पितृपक्ष असतानाही राजकीय चर्चा आणि बैठका सुरू असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले की, "पितृपक्षात सकारात्मक गोष्टी टाळण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र, जागावाटपाबाबतच्या बैठका आम्ही यापूर्वीच सुरू केल्या. ज्या गोष्टी आधीपासून सुरू आहेत, त्या पितृपक्षात सुरू राहण्यावर काही अडचण आहे, असं वाटत नाही. नव्यानं काही गोष्टी करायच्या असतील काही निर्णय घ्यायचे असतील, तर पितृपक्षाचा विचार केला जातो."

संजय तटकरे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

पितृपक्षाचा आमच्याशी संबंध नाही : "काँग्रेस पुरोगामी विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेस पितृपक्षाचा कालावधी अयोग्य आहे, असं मानत नाही. आमच्यासाठी उगवणारा प्रत्येक दिवस हा चांगला आणि शुभच असतो, असं आम्ही मानतो. त्यामुळं आम्ही या काळात जागा वाटपाची चर्चा न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पितृपंधरवडा हा काहीजण अंधश्रद्धेपोटी मानत असतील, मात्र आम्ही श्रद्धा मानणारे लोक आहोत, त्यामुळं पितृपक्षामध्येही चांगली कामं करतो," असं काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

पितृपक्षात मनोज सौनिकांनी स्वीकारला पदभार : राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज महारेराचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. पितृपक्षात मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अजय मेहता यांचा कार्यकाळ संपल्यानं सौनिक यांना पदभार देणं गरजेचं होतं. त्यामुळं त्यांनी पदभार स्वीकारला. पितृपक्षामध्ये इतर गोष्टी करण्याबाबत अथवा राजकीय विषयांच्या होणाऱ्या बैठकांबाबत आपण काही सांगू शकत नाही. यासंदर्भात पक्षाचे प्रवक्तेच आपली भूमिका मांडतील."

हेही वाचा

  1. "महाविकास आघाडीला सोडून काँग्रेस..."; संजय राऊतांना विश्वास - Sanjay Raut
  2. कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - CM DCM Slams Vijay Wadettiwar
  3. वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका; 'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार - One Nation One Election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.