ETV Bharat / politics

ख्रिश्चन समाजाला हवंय स्वतंत्र 'आर्थिक विकास महामंडळ', ख्रिश्चन समाजाची सरकारवर नाराजी - Christian Arthik Vikas Mahamandal - CHRISTIAN ARTHIK VIKAS MAHAMANDAL

Omega Christian Mahasangh : आगामी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) आता तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध योजनांचं प्रमोशन जोरदार सुरू असून, समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत. एका बाजूला मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय चर्चेत असतानाच सरकारकडून मात्र आर्थिक योजनांची सातत्याने घोषणा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजासाठी 'परशुराम आर्थिक विकास महामंडळा'ला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ख्रिश्चन समाजाने देखील ख्रिश्चन बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावं ही जुनी मागणी सरकार समोर ठेवली आहे.

Mahayuti
महायुती सरकारवर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 8:47 PM IST

Updated : Sep 30, 2024, 9:18 PM IST

मुंबई Omega Christian Mahasangh : काही दिवसांपूर्वीच शासनाने ब्राह्मण समाजासाठी 'परशुराम आर्थिक विकास महामंडळा'ची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर आता ख्रिश्चन समाजाने देखील आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. ख्रिश्चन समाजासाठी देखील एक स्वतंत्र 'आर्थिक विकास महामंडळ' असावं ही जुनी मागणी ख्रिश्चन समाजाकडून पुन्हा एकदा सरकार समोर ठेवण्यात आली आहे. राज्यात मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. पंडिता रमाबाई यांच्या नावाने ख्रिश्चन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी, ओमेगा ख्रिश्चन समाजाने केलीय.

ख्रिस्ती धर्माचा प्रसार : राज्यात साधारण 30 लाखांहून अधिक मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव असल्याचं ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आनंद शिंदे सांगतात. याला देखील एक इतिहास आहे. आपल्या देशावर मुघलांप्रमाणेच पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी देखील राज्य केलं. या प्रत्येकाचा कालखंड वेगळा होता. परंतु, मुघल वगळता पोर्तुगीज, डज, इंग्रज यांचा साधारण समकालीन कालखंड मानला जातो. याच काळात आपल्या देशात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. यात महाराष्ट्र देखील मागे नव्हता. पंडिता रमाबाई या यापैकीच एक होत्या.

प्रतिक्रिया देताना आनंद शिंदे (ETV Bharat Reporter)

मराठी लोकांनी स्वीकारला ख्रिश्चन धर्म : ज्या काळात आंतरजातीय विवाह समाजात गुन्हा मानला जायचा, त्या काळात पंडिता रमाबाई यांनी आपला ब्राह्मण धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. या कालखंडात अनेक महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मात्र, त्यांची नावे ही मराठीच राहिली. असे साधारण 30 लाखांहून अधिक मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव आज आपल्या राज्यात आहेत. तर, साधारण पाच टक्के इंग्रजी नावाचे ख्रिश्चन बांधव आपल्या राज्यात असल्याचं ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आनंद शिंदे सांगतात.

40 वर्षांपासून करत आहेत मागणी : राज्य सरकारनं आतापर्यंत ख्रिश्चन समाज वगळता जवळपास सर्वच जाती-धर्मांसाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलीय. मात्र, ख्रिश्चन समाजासाठी अद्यापही आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली नाही. राज्याच्या अनेक भागात मराठी नावाचे ख्रिश्चन तरुण-तरुणी केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यानं शिक्षणापासून आणि अन्य सोयी सुविधांपासून वंचित आहेत. या मुलांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी यासाठी मागील 40 वर्षांपासून 'पंडिता रमाबाई आर्थिक विकास महामंडळाची' मागणी केली जात असल्याचं ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी सांगितलं.

ख्रिश्चन समाजाची नाराजी दूर करावी : मंत्रिमंडळ बैठकीत तरी इतर समाजाप्रमाणे ख्रिश्चन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची सरकार घोषणा करेल अशी आम्हाला आशा होती. मात्र, तसं काही झालं नाही. किमान आता तरी सरकारने ख्रिश्चन समाजासाठी 'पंडिता रमाबाई आर्थिक विकास महामंडळाची' घोषणा करून ख्रिश्चन समाजाची नाराजी दूर करावी अशी मागणी, आनंद शिंदे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. राज्यात 'मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करा ; ख्रिश्चन समाजाची मागणी
  2. आसाममधील ख्रिश्चन समाजाचे लोक आनंदाने संघाच्या शाखेत येतात - मोहन भागवत

Last Updated : Sep 30, 2024, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.