ETV Bharat / politics

...म्हणून शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर झाली बैठक; नितेश राणेंचा गंभीर आरोप - Nitesh Rane On MVA - NITESH RANE ON MVA

Nitesh Rane On Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (25 मार्च) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित होते. या बैठकीवरुन आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली आहे.

Nitesh Rane says meeting held between Uddhav Thackeray and Sharad Pawar to contest elections without Congress
भाजपा आमदार नितेश राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 8:11 PM IST

नितेश राणे यांची पत्रकार परिषद

मुंबई Nitesh Rane On Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीत काही जागांमुळं जागा वाटपाचा तिढा सुटायला तयार नाही. याच पार्श्वभूमीव सोमवारी (25 मार्च) संध्याकाळी 'मातोश्री'वर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. तर या बैठकीवरुन आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. तसंच काँग्रेस विरहित निवडणूक लढवण्यासाठीच ही बैठक पार पडल्याचा, दावाही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे? : या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणे म्हणाले की, "मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. बैठकीत काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची, यावर चर्चा झाली. याचाच अर्थ काँग्रेससोबत सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावानं चर्चा आता संपल्यात जमा आहे. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिलाय. तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींशी बोला. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू इच्छित नाही, असं कॉंग्रेस नेते म्हणताय. तसंच हे खरं आहे की खोटं, हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं."

संजय राऊतांवरही साधला निशाणा : यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत राणे म्हणाले की, "संजय राऊत यांच्यावर आता कोणालाच विश्वास राहिलेला नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील राऊतांना खोटारडं म्हणालेत. आमचा विषय तर सोडाच, मात्र महाविकास आघाडीतील लोकांना देखील आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही."

उमेदवारीसाठी ठाकरेंना पैसे मागायची सवय : पुढं ते म्हणाले की, "काँग्रेसच्या एका नेत्यांनं मला असं सांगितलंय की उद्धव ठाकरे यांची उमेदवारीसाठी पैसे मागायची सवय गेली नाही. त्यामुळं सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत आम्ही बोलणार नाही. त्यामुळंच कालच्या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता." तसंच ज्या नेत्यानं नितेश राणेंना ही माहिती दिली तो विदर्भातील असल्याचंही राणेंनी सांगितलं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, असंही ते म्हणाले.

अंबादास दानवे भाजपात जाणार? : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भाजपाकडून पक्षात येण्यासाठी वारंवार फोन केला जात असल्याचा आरोप केल्या जात आहे. यावर प्रतिक्रिया देत नितेश राणे म्हणाले की, "दानवे यांची चर्चा आता हॉट लाईन वर सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय 'आगे आगे देखो, होता है क्या', त्यामुळं सगळ्याच ब्रेकिंग मी आज देणार नाही."

हेही वाचा-

  1. "शकुनी मामामुळंच 'वंचित'...."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Nitesh Rane On Sanjay Raut
  2. 'राजकीय स्टेटमेंट करू नका', मनोज जरांगेंना नितेश राणेंचा सल्ला, नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर केली सारवासारव
  3. उद्धव ठाकरे मातोश्रीत राहणार की तुरुंगात जाणार ? ; नितेश राणेंनी हल्लाबोल करत सांगितला संजय राऊतांचा 'धंदा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.