मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुसरी यादी जाहीर केली. तसंच शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही तीन उमेदवारांची यादी जाहीर केली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी : शिवसेना (उबाठा) पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केलीय. यामध्ये तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत शिवसेनेनं वर्सोव्यातून हारून खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्लेमधून संदीप नाईक यांना तिकीट दिलं आहे.
माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 26, 2024
१६४ वर्सोवा - हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम - संजय…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी
1 : एरंडोल सतीश - अण्णा पाटील
2 : गंगापूर - सतीश चव्हाण
3 : शहापूर - पांडुरंग बरोरा
4 : परांडा - राहुल मोटे
5 : बीड - संदीप क्षीरसागर
6 : आर्वी - मयुरा काळे
7 : बागलान - दीपिका चव्हाण
8 : येवला - माणिकराव शिंदे
9 : सिन्नर - उदय सांगळे
10 : दिंडोरी - सुनीता चारोस्कर
11 : नाशिक - पूर्व गणेश गीते
12 : उल्हासनगर - ओमी कलानी
13 : जुन्नर - सत्यशील शेरकर
14 : पिंपरी - सुलक्षणा शीलवंत
15 : खडकवासला - सचिन दोडके
16 : पर्वती - अश्विनीताई कदम
17 : अकोले - श्री अमित भांगरे
18 : अहिल्यानगर शहर - अभिषेक कळमकर
19 : माळशिरस - उत्तमराव जानकर
20 : फलटण - दीपक चव्हाण
21 चंदगड - नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22 : इचलकरंजी - मदन कारंडे
हेही वाचा -
- राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
- नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, उदयनराजेंचा खोचक टोला
- धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती