ETV Bharat / politics

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठकीत काय होणार चर्चा? - NCP Meetings Inside story

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 1:00 PM IST

Updated : Jun 6, 2024, 1:20 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दोन बैठका बोलावल्या आहेत. एका बैठकीत पक्षाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बैठकीत पक्षाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या कामगिरी संदर्भात चर्चा होणार आहे.

NCP Meetings Inside story
NCP Meetings Inside story (Source- ETV Bharat)

मुंबई- उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांच्या दक्षिण मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

देवगिरीतील राष्ट्रवादीच्या बैठकीला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या व्यतिरिक्त इतर प्रमुख नेते उपस्थित राहिले.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं चार जागा लढविल्या आहेत. त्यापैखी फक्त रायगड लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादीला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

  • गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे स्वतंत्र चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळविले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद प्रथमच समोर आले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे काय आहेत आरोप?

  • महायुती सरकारमध्ये सामील होताना भाजपाने मित्रपक्षांचा आदर करण्याचे वचन दिले होते, याची आठवण नुकतेच छगन भुजबळ यांनी करून दिली होती.
  • बारामतीत भाजपासह शिंदे गटानं पुरेशी मेहनत न घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता.

या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव

  • उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्या भाजपाच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला.
  • शिरूरमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढाळराव यांनी शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांचा विजय कसा होतो, हे मी पाहतो, असे अजित पवार यांनी आव्हान दिलं होतं. मात्र, अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
  • अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना जिव्हारी लागला.

हेही वाचा-

  1. महायुतीमधील शिवसेनेसह राष्ट्रवादीचं वाढलं महत्त्व, केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी? - NDA gov formation
  2. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीचा बोलबाला; तीन जागांवर विजय तर एक जागा दोन मतांनी निसटली - Arunachal Pradesh Results 2024
  3. राज्यात 'या' मतदारसंघात महाविकास
  4. आघाडीचा जोर; काय सांगतो अंदाज? पाहा स्पेशल रिपोर्ट - Lok Sabha Election Results 2024

Last Updated : Jun 6, 2024, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.