ETV Bharat / politics

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' शिलेदारांनी घेतली शपथ; जाणून घ्या, राजकीय प्रोफाईल - Narendra Modi Oath Ceremony - NARENDRA MODI OATH CEREMONY

Modi 3.0 Government : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 70 हून अधिक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राज्यातील 6 खासदारांनी शपथ घेतली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 4:16 PM IST

Updated : Jun 9, 2024, 10:42 PM IST

नवी दिल्ली/मुंबई Modi 3.0 Government : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह भाजपा आणि मित्र पक्षांच्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राज्यातून नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह पियुष गोयल यांनीही सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यांच्यासह रक्षा खडसे, पुण्याचे नवनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ हे भाजपाच्या कोट्यातून राज्यमंत्री तर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेतून राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) झाले आहेत. तसंच आरपीआयचे आठवले गटाचे रामदास आठवले यांनी देखील सलग तीसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

खासदार नितीन गडकरी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
खासदार नितीन गडकरी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Social Media)

नितीन गडकरी : भाजपाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केलाय. यानंतर आता नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक केली. सामान्य कार्यकर्ते, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार आणि आता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अशी गडकरी यांची राजकीय कारकीर्द आहे. मोदी सरकारच्या मागील दोन कार्यकाळामध्ये त्यांनी रस्ते विकास मंत्री म्हणून देशभर केलेल्या कामांमुळं त्यांना रोडकरी म्हणूनही ओळखलं जातं. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 26 मे 2014 ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हा त्यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. त्यांनंतर 2019 ते 2024 या काळातही त्यांच्याकडं भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता. यापुर्वी महाराष्ट्रात 1995-1999 या काळात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार सत्तेत असतानाही ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

खासदार पियुष गोयल यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
खासदार पियुष गोयल यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Social Media)

पियुष गोयल : नितीन गडकरी यांच्याप्रमाणे पियुष गोयलही मोदींच्या 2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. यादरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालयही सांभाळलं आहे. आता मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातही पियुष गोयल यांना संधी मिळाली आहे. यापुर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. आता या सरकारमध्ये त्यांना कोणतं मंत्रालय मिळत हे पाहावं लागेल.

खासदार रक्षा खडसे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
खासदार रक्षा खडसे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Social Media)

रक्षा खडसे : जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिलाय. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केलाय. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात रक्षा खडसेंना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालीय. पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या रादकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या रक्षा खडसे यांना 2014, 2019 आणि आता 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय. याचं फळ म्हणून त्यांना थेट केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागलीय.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (social Media)

मुरलीधर मोहोळ : पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळालंय. त्यांच्या रुपानं पुण्याला अनेक वर्षानंतर केंद्रात मंत्रीपद मिळालंय. यापुर्वी मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 असे चार वेळा विजयी झाले आहेत. तसंच 2017-2018 दरम्यान ते पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. यानंतर 2019-2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचं महापौर पदही त्यांनी भुषवलंय. यंदाच्या लोकसभेत त्यांना भाजपानं उमेदवारी दिली आणि त्यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करत विजय मिळवला. आता ते थेट मोदी सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. विशेष म्हणजे मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Social Media)

प्रतापराव जाधव : वऱ्हाडातील बुलढाणा लोकसभेतून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलीय. जाधवांच्या रुपानं 1997 नंतर तब्बल 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळालंय. प्रतापराव जाधव हे 1990 पासून राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिलाय. 1992 ते 1995 दरम्यान त्यांनी मेहकर पंचायत समितीचे सदस्य पदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर ते 1995 ते 2009 दरम्यान तीन वेळा आमदारही होते. याच दरम्यान त्यांनी राज्यात क्रीडा मंत्री म्हणूनही कामही पाहीलंय. यानंतर 2009 पासून ते या मतदारसंघाचे खासदार आहेत.

रामदास आठवले यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
रामदास आठवले यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Social Media)

रामदास आठवले : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्येही रामदास आठवले राज्यमंत्री होते. देशात एकही आमदार, नगरसेवक नसतानाही ते केंद्रात मंत्री आहेत हे विशेष!

हेही वाचा :

  1. 'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol
  2. मोदी 3.0 मध्ये राज्यातील कोणत्या खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, वाचा संभाव्य यादी - Cabinate Ministers

Last Updated : Jun 9, 2024, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.