ETV Bharat / politics

काँग्रेसमधील घरभेदीवरून अशोक चव्हाण-नाना पटोले यांच्यात वाक्युद्ध, भाजपा प्रवक्त्यानं 'ही' दिली प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसमध्ये राहून काही कार्यकर्ते भाजपाचं काम करत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारानं संतापलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सुनावलं. यावर भाजपाच्या प्रवक्त्यानं प्रतिक्रिया दिलीय.

Nana Patole On Ashok Chavan
नाना पटोले अशोकराव चव्हाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 2:23 PM IST

नांदेड लोकसभा निवनडणुकीत आरोप-प्रत्यारोप

नांदेड Lok Sabha Election 2024 : "काँग्रेसमध्ये राहून अशोक चव्हाणांची चाकरी करू नका. ज्यांना जायचं आहे, त्यांनी सरळ जावं. अन्यथा गाठ आमच्याशी आहे," अशी तंबी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पाटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या पटोले नाळेश्वर येथील सभेत बोलत होते. काँग्रेसमध्ये राहून काही कार्यकर्ते भाजपाचं काम करत आहेत, अशी पटोले यांना शंका आहे.

नाना पटोले भाजपाचे खासदार : नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या तंबीमुळं भाजपानं मात्र सडकून टीका केलीय. भाजपाचे प्रवक्ते प्रवीण साले म्हणाले, " नाना पटोले हेदेखील भाजपाचे खासदार राहिले आहेत. अशोक चव्हाण भाजपात आल्यामुळं नाना पटोले हे नांदेडात येऊन काहीतरी काम करत असल्याचा दिखावा करत आहेत." काँग्रेसनं त्यांना खासदार केल्यामुळं दिग्गज नेते काँग्रेस सोडत असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात आलाय.

काँग्रेससमोर आव्हान : "लोकसभा निवडणुकीच्या प्रचार थंडावला आहे. त्यानंतर मतांच्या बेरजेसाठी गनिमी कावा, डावपेच आणि मॅनेजमेंटसाठीची धडपड सुरू होईल. भाजपाकडं ज्याप्रमाणं यंत्रणा आहे, तशी यंत्रणा आजपर्यंतच्या प्रचारात काँग्रेसकडं दिसली नाही. त्यातच काँग्रेसमध्येच काही घरभेदी आहेत. जसं दिसतं तसं नसतं," असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केलंय. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "आमच्यात सुपारी घेतलेले काही कलावंत आहेत. त्यामुळं घरभेद्यांना वेळीच आवर घालण्याचं काँग्रेससमोर आव्हान आहे."

प्रतापराव चिखलीकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती घेतलं. त्यामुळं काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांना नांदेडात कुणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न पडला होता. परंतु, नांदेड काँग्रेसकडून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे एकमेव नाव सूचविण्यात आल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपाकडून विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आलं. वसंतराव विरुद्ध प्रतापराव अशी नांदेड लोकसभा मतदारसंघात लढत होत आहे. काँग्रेसने भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे. तसेच, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या एकाही नेत्याची नांदेड लोकसभेसाठी जाहीर सभा झाली नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या एकजुटीवरही चर्चा होत आहे.

दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : सामान्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या निष्ठावंतांनी भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे. मात्र, काँग्रेसमध्ये राहूनदेखील आजही अनेकजण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचेच समर्थक आहेत. त्यामुळं शेवटच्या काही तासांत त्यांची काय भूमिका राहते, हे देखील महत्त्वाचं आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अशोक चव्हाण आणि भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी ताकद लावत आहेत.

हेही वाचा -

  1. बिनविरोध विजय होत असेल तर 'नोटा' कशाला? समीर विद्वांस, विनोद तावडे म्हणाले.... - Surat Lok Sabha Result 2024
  2. "भाजपा देशाचं भविष्य तर काँग्रेस भूतकाळ", उदयनराजेंचा हल्लाबोल - Udayanraje Bhosale
  3. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षेवरुन टीकेची झोड; वाय नको तर झेड प्लस सुरक्षा द्या विरोधकांचा टोला - Parth Pawar Security

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.