ETV Bharat / politics

"गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण...", नाना पटोलेंचा हल्लाबोल - Nana Patole

Nana Patole Criticized Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. तर यावरुन 'गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, निवडणूक आली की महाराष्ट्र आठवला का?', असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केलाय.

Nana Patole says Narendra Modi did not remember Maharashtra while driving industries to Gujarat
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 6:24 PM IST

मुंबई Nana Patole Criticized Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. "मोदींनी सोलापूर, सातारा आणि पुण्यातील प्रचारसभेतून नेहमीचंच काँग्रेस विरोधी रडगाणं गायलंय. मोदींना प्रचारासाठी सातत्यानं महाराष्ट्रात यावं लागतं, यावरुन भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार गुजरातला पळवून नेत असताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना त्यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही. पण आज पराभव दिसू लागल्यानं पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का?", असा खोचक सवालही नाना पटोले यांनी केला.

संविधानाला आरएसएस आणि भाजपाचा विरोध : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आणि संविधानानं दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा पहिल्या पासूनच विरोध आहे. मागील 10 वर्षांत धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजपावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचं पाप नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं केलंय. 400 जागा जिंकल्या की आरक्षण बदलू असं जाहीर सांगणारे मोदींचे खासदार आणि मंत्रीच आहेत. पण जनता भाजपाला घरी बसवणार याची जाणीव होताच मोदींनी भाषा बदलली. आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा, आरएसएस असून संधी मिळाली तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे स्पष्ट आहे", असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

पुढं ते म्हणाले की, "काँग्रेस पक्षानं दलित नेत्यांचा अपमान केला हे आणखी एक असत्य आणि खोटारडं विधान नरेंद्र मोदींनी केलंय. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनच्या पायाभरणी कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी बोलावलं नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावलं नाही, संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावलं नाही, कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत म्हणून, हा त्यांचा अपमान नाही का? परंतु, मोदी म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. मागील 10 वर्षांत देशातील दलित, मागास, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात प्रचंड वाढ झालीय, हे मोदी विसरले असतील पण जनता विसरलेली नाही."

छत्रपतींचा उपयोग केवळ मतांसाठी : "भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्यानं अपमान केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपाला फक्त मतांसाठी हवे आहेत, निवडणुका आल्या की छत्रपतींचं नाव घेता आणि नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपाची निती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षांत सोलापुरात पाचवेळा आले पण 5 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत." तसंच शहराला सात दिवसातून एकदा पाणी येते, 'हर घर नल, नल में जल' ही मोदी यांची योजना सोलापुरात फेल गेली आहे. सोलापुरात 'नल है पर नल में जल नही', अशी परिस्थिती असल्याचंही पटोले म्हणाले.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit
  2. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
  3. "पंतप्रधान मोदी अब्जाधीशांसाठी काम करतात, तर पटनायक...", राहुल गांधींचा हल्लाबोल - Rahul Gandhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.