ETV Bharat / politics

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, महायुतीविरोधात 'जोडे मारो' आंदोलन - MVA Jode Maro protest - MVA JODE MARO PROTEST

आजच्या महविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हुतात्मा चौक परिसरात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मुंबई पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक यांची कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

MVA Jode Maro protest
महाविकास आघाडीचे आंदोलन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 12:08 PM IST

Updated : Sep 1, 2024, 1:59 PM IST

मुंबई- मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर राज्यांमध्ये शिवप्रेमी आणि सामान्य जनतेत नाराजी लाट पाहायला मिळत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज 'जोडो मारो' आंदोलनाची हाक दिली आहे. शिवसेना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहे. सरकारने आम्हाला परवानगी जरी दिली नाही तरी सरकारचा निषेध व्यक्त करण्यावर आम्ही ठाम असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

महायुतीविरोधात 'जोडे मारो' आंदोलन (Source- ETV Bharat Reporter)

Live updates

  • शरद पवार म्हणाले, " या सरकारनं अनेक भ्रष्टाचार केले आहेत. महाराजांचा हा पुतळा मागील कित्येक वर्षापासून उभा आहे. पण 8 महिन्यांपूर्वी बसलेला पुतळा कोसळला. या सरकारला घालवावे लागेल."
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले," सरकारकडून शिवपुतळ्याचा अवमान करण्यात आला. महाराजांच्या अवमानाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या पुतळ्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. या शिवद्रोही सरकारचा निषेध करत आहोत."
  • उद्धव ठाकरे म्हणाले, " आम्ही या शिवद्रोहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. ते राजकारण नाही. गजकर्ण करतात. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनतेच्या मनात संताप आहे. आता या सरकारला गेट आउट म्हणायची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून माफीनामा देण्यात आला. हा देशातील सर्व शिवप्रेमींचा अपमान आहे. मोदी तुम्ही कुणा कुणाची माफी मागणार आहात. ज्याने पुतळा बनवला त्यांची माफी मागणार? संसद भवनाची माफी मागणार? कुणाची माफी मागणार?"
  • छत्रपती शाहू महाराज म्हणाले, "मालवणमध्ये काय झाले, हे सर्वांनी पाहिलं आहे. केवळ देशात नाही तर देशाबाहेरही शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.निश्चितच महाराष्ट्राचा अपमान आहे. याला जे दोषी असतील त्यांना मोकळं सोडता कामा नये. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराजांचा मान सर्वांनी ठेवला पाहिजे. पुतळा पडला, त्याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे."

महाविकास आघाडीने पुकारलेल्या जोडो मारो आंदोलनाला मुंबई, कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर येथून महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरेचे पदाधिकारी दाखल झाले आहेत. संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करणा आहोत. लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सरकार विरोधात निषेध व्यक्त करणार आहोत, असे आंदोलकांनी म्हटलं आहे.

मध्य रेल्वेकडून आज मेगा ब्लॉक वाढवण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळेल त्या वाहनांनी मुंबईत दाखल झाले आहे. अंबरनाथ, कल्याण, बदलापूर येथील ठाकरे शिवसैनिक सकाळची लोकल पकडून मुंबई दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सरकारनं आमच्या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी आम्ही लोकशाही मार्गानं आंदोलन करणार आहोत. या सरकारनं प्रत्येक वेळी परवानगी नाकारून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. महाराजांच्या पुतळा पडल्यानं जनतेच्या मनात संताप आहे. हे जनता खपपून घेणार नाही-शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार- अनिल देसाई

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सुरुवात- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया आंदोलनाला सुरुवात झाली. महविकास आघाडीचे सर्व नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं परिसर दणाणून गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय..., खाऊन खाऊन खाणार कोण? भाजपा शिवाय हाय कोण? अशी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

जनता त्यांना चपलांनी मारेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "महाराजांचा पुतळा कोसळणं ही आमच्यासाठी अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा असू शकत नाहीत. आमच्यासाठी अस्मितेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. घटनेवर राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्यासाठी दोन जेसीबी आणले. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना चपलांनी मारेल."

हेही वाचा-

  1. महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही, देवेंद्र फडवणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis On MVA Protest
  2. "राजकोट किल्ल्यावर मोदी शाहांचे दलाल, शिवद्रोही..."; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Last Updated : Sep 1, 2024, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.