मुंबई EVM Hacking Case : वनराई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम १८८ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 128 (2) सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत गुन्हा दाखल (MLA Vilas Potnis FIR) करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रतिनिधीनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल : रविंद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वनराई पोलिसांनी दोघांना देखील 41 अन्वये नोटीस पाठवून चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वायकर यांच्या मेहुण्या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा : मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याचे सिद्ध झाल्यानंतर रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधातही पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करून भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ आणि १२८ (२) लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण : "मतदानयंत्र अनलॉक करण्यासाठी मोबाइलवर ओटीपी येत नाही. मतदानयंत्राचे कोणत्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून, त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. यामुळे संबंधित वृत्तपत्राला बदनामीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे," असे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यंवशी यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -
- "रवींद्र वायकरांच्या निकालात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोठा हात''; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- "ईव्हीएम अन् मोबाईलचा संबंध..."; ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
- "पराभव झाल्यानं रडीचा डाव": रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, मुख्यमंत्री म्हणाले.... - MP Ravindra Waikar on EVM Hacking