ETV Bharat / politics

महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024 - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीनं आता विधानसभा निवडणूक 2024 साठी रणशिंग फुंकलय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुंबईत मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा केलीय.

Maharashtra Assembly Election 2024
नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 6:18 PM IST

मुंबई Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल महाविकास आघाडीकडून वाजवण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री कोणाचा होणार? यापेक्षा राज्यावर जे संकट आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आणि महायुतीचं सरकार उलथवून लावण्यासाठी विधानसभा निवडणुकीला सर्वांनी एकत्र सामोरं जायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात नेत्यांनी केला.

राज्य सरकार घाबरलं : मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार विविध घोषणांचा पाऊस पाडत आहे. राज्य सरकार घाबरलं आहे. केंद्रातील सरकार तर आधीच घाबरलं आहे. काल राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून अपमानजनक सन्मान दिला. हा लोकशाहीवरील आघात आहे. भ्रष्ट सरकारनं काळा पैसा जमवला आहे. राज्यातील सरकारी पैसा हा शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी आम्ही राज्यात परिवर्तन करणार असून आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे."

परिवर्तनासाठी सज्ज राहा : "उद्या आपली दिशा काय राहणार आहे, याबाबत आज महाविकास आघाडीचा मेळावा होत आहे. राज्यात परिवर्तन हवं असेल तर आधी काय केलं पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे. आज राज्यकर्त्यांची भूमिका ही हुकूमशाही आहे. चुकीचे सत्ताधारी तिथे बसले आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि राज्यात परिवर्तन होण्यासाठी काम केलं पाहिजे. विधानसभा निवडणूक आम्ही सगळे एक दिलानं लढणार आहोत. एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, मतभेद बाजूला ठेवा आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी महायुती सरकार घालवण्यासाठी एकजुटीनं एकत्र या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

ही लढाई सोपी नाही : "लोकसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आता विधानसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे. ही लढाई एवढी सोपी नाही. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीनं निवडणूक लढायला पाहिजे. आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे." असं रणशिंग उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात फुंकलं.

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया : "लोकसभा निवडणुकीत हवेदावे सोडून एकत्र लढलो. तसं आपण आता विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलं पाहिजे. आज तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आहेत. आजच मुख्यमंत्री कोणाचा होणार हे जाहीर करून टाका. त्याला माझा उघडपणे पाठिंबा असेल." असं मुख्यमंत्री पदावर होणाऱ्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले. "माझी लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई आहे. मला काय मिळणार यापेक्षा माझ्या राज्याला काय मिळणार हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे." असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

  1. अजित पवारांची राजकीय कुस्ती आणि फसलेले डाव - Ajit Pawar
  2. नारायण राणेंची खासदारकी धोक्यात ?; मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं समन्स, 12 सप्टेंबरला सादर करावं लागणार उत्तर - Bombay HC Summons To Narayan Rane
  3. अजित पवार हे घरातच कुस्ती खेळणार; संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut
  4. "घरांच्या मोळ्या जाळून मतांच्या पोळ्या भाजता, म्हणून तुम्हाला गाडणार"; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डागली तोफ, मुख्यमंत्री चेहऱ्यावरुन केलं मोठं भाष्य - MVA Nirdhar Melava Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.