ETV Bharat / politics

निवडणुकीचं टेन्शन विसरून होळीसाठी नवनीत राणा थेट मेळघाटात - Navneet Rana - NAVNEET RANA

Navneet Rana Holi Festival : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शनिवारी होळी (Holi Festival) निमित्तानं अमरावतीतील मेळघाटाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मेळघाटच्या जंगलात वळण रस्त्यावर एका हनुमान मंदिरात माकडांच्या टोळीला स्वतःच्या हातानं केळी आणि बिस्किट खाऊ घातलं.

Navneet Rana
खासदार नवनीत राणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 10:27 PM IST

खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर

अमरावती Navneet Rana Holi Festival : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना निवडणुकीचे टेन्शन बाजूला सारून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या होळी (Holi Festival) निमित्तानं पाच दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या होळीच्या उत्सवात खासदार नवनीत राणा या आदिवासी संस्कृती आणि परंपरेमध्ये रंगल्या आहेत.

जात्यावर दळले दळण : शनिवारी सकाळी खासदार नवनीत राणा या आपल्या कार्यकर्त्यांसह मेळघाटात दाखल झाल्या. मेळघाटातील एका छोट्याशा आदिवासी गावांमध्ये त्यांनी एका घरात जात्यावर दळण दळणाऱ्या महिलेसोबत स्वतः जात्यावर दळण दळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जग आधुनिक होत असताना देखील मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपून ठेवली असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी मोठ्या अभिमानानं सांगितल्या.

वानर सेनेला खाऊ घातले केळ आणि बिस्कीटे : मेळघाटच्या जंगलात वळण रस्त्यावर एका हनुमान मंदिरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. मंदिरात आलेल्या माकडांच्या टोळीला खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हातानं केळी आणि बिस्किटे दिलेत. एका मागून एक माकडांनी खासदार नवनीत राणा यांच्या हातातून केळी घेतली. माकडांना खाऊ घालण्याचा आगळावेगळा आनंद यावेळी खासदार नवनीत राणा यांनी अनुभवला.

अनेक गावात पेटवणार होळी : खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांच्यासोबत लग्न करून अमरावतीत आल्या तेव्हापासून, दरवर्षी मेळघाटात होळीच्या निमित्तानं पाच दिवस असतात. दरवर्षीप्रमाणं उद्या अनेक गावांमध्ये खासदार नवनीत राणा या स्वतः आपल्या हातानं होळी पेटवतात. आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या होळी उत्सवात सादर केल्या जाणाऱ्या नृत्यांमध्ये देखील खासदार नवनीत राणा या सहभागी होऊन नृत्याचा आनंद घेतात.

हेही वाचा -

  1. अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections
  2. MP Navneet Rana : नवनीत राणा भाजपामध्ये जाण्यासाठी सज्ज; अपक्ष लढण्याचीही तयारी
  3. Lok Sabha elections : "मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही"; अमरावतीत झळकलं पोस्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.