ETV Bharat / politics

"यांचं मानसिक संतुलन बिघडलं...", अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया - Anil Bonde Controversial Statement

Anil Bonde Controversial Statement : भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर त्यांची जीभ छाटू नये जिभेला चटके द्यावेत, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावर काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतला असून दंगल घडवण्यासाठी बोंडे यांनी वक्तव्य केल्याचा आरोप केला तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना भान राखावं, अशी प्रतिक्रिया दिलीय.

Anil Bonde Controversial Statement
राहुल गांधी, अनिल बोंडे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 5:13 PM IST

मुंबई Anil Bonde Controversial Statement : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांना देशातील आरक्षण संपवायचं आहे, ते संविधानाच्या विरोधात वागत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं संविधान बदलण्याचा डाव रचत असल्याची टीका भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी केली. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटावी, असं वादग्रस्त विधान केलं. संजय गायकवाड यांच्या टीकेनंतर अनिल बोंडे यांनी पुन्हा राहुल गांधींवर निशाणा साधत "राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यावे, असं विधान केलं. बोंडे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय : अनिल बोंडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं ते काहीही बरळत आहेत. एखाद्या अशिक्षित व्यक्तीनं असं विधान केलं असतं, तर त्याला समजून घेता आलं असतं, पण डॉक्टरांंनं असं विधान करणं हे मानसिक संतुलन बिघडण्याचं लक्षण आहे. बोंडे यांना असं विधान करून दंगल घडवायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खबरदारी बाळगावी. आपले नेते त्यांनी सांभाळावेत. तुम्ही स्वतः फेक नेरेटिव्हचे बादशहा आहात. तुमचे हे जे कोण चमचे आहेत, यांनादेखील तुम्ही सांभाळा. यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करून दंगल घडवली, तर त्याला गृहराज्यमंत्री जबाबदार राहतील. राहुल गांधींचं जनतेच्या मनात स्थान अबाधित आहे, त्यामुळं त्यांच्यावर अशी चिखलफेक करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर नेत्यांच्या प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

भागवत कराड यांच्याकडून सारवासारव : अनिल बोंडे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले, "राहुल गांधी नेहमीच देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करणारी वक्तव्यं करतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आरक्षण बदलायचं आहे, असं सांगताना राहुल गांधींच्या मनात नेमकं काय आहे? हे आता स्पष्ट झालं. पोटात एक आणि ओठावर एक अशी राहुल गांधींची वृत्ती आहे आणि ते आता स्पष्ट झालंय. त्यामुळं राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आलाय. बोंडे यांचं या संदर्भातील विधान केवळ प्रतिकात्मक विधान आहे. एखाद्या व्यक्तीबाबत खूप राग आल्यावर आपण ज्या पद्धतीनं व्यक्त होतो तसं हे वक्तव्य आहे." भागवत कराड यांनी बोंडे यांच्या वक्तव्याबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये : राहुल गांधी नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राहुल गांधी सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, असं असतानाही ते संसदेत न बोलता देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला. फक्त राहुल गांधींनाच आरक्षण बदलायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट केलय. पण, महायुतीच्या नेत्यांनीही राहुल गांधींच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काळजी घ्यायला हवी. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये, अशी प्रतिक्रिया परांजपे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

  1. "अनिल बोंडे यांना तत्काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा"- 'त्या' वादग्रस्त विधानावरून यशोमती ठाकूर यांचा निशाणा - Maharashtra Politics
  2. एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेला मान्यता, कोविंद पॅनेलच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - One nation one Election
  3. 'कुठं गेलं ह्यांचं हिंदुत्व...?' भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल, BCCI वरही जहरी टीका - IND vs BAN Test Series

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.