ETV Bharat / politics

'मनसे' महायुतीत? मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस-राज ठाकरे यांच्यातील बैठक संपली! - MNS May Join NDA

MNS May Join NDA : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होऊ शकते. मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज दीड तास बैठ झाली. या बैठकीनंतर मनसेला एनडीएमध्ये घेण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत.

'मनसे' महायुतीत? मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस-राज ठाकरे यांच्यातील बैठक संपली, लवकरच होणार घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 12:45 PM IST

Updated : Mar 21, 2024, 1:12 PM IST

मुंबई MNS May Join NDA : भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीत आता मनसेही सहभागी होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. आज संध्याकाळपर्यंत याची औपचारिक घोषणा होऊ शकते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या तासाभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते.

दोन जागांसाठी मनसे आग्रही : लोकसभेसाठी महायुतीची समीकरणं जुळविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी अमित शाहांकडे दोन जागांची मागणी केली होती. मात्र ती मागणी अमित शाहांनी फेटाळून लावल्याचं सुत्रांनी सांगितलं. लोकसभेसाठी मनसेला दक्षिण मुंबई, शिर्डी अथवा नाशिकची जागा हवी आहे. यानंतर बुधवारी मध्यरात्रीदेखील राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तीन नेत्यांमध्ये सुमारे दीड तास बैठक झाली. यामुळं मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाची आजच औपचारिक घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राज ठाकरे ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीत शिवसेनेसह राष्ट्रवादीकडून स्वागत- महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी ( अजित पवार गट) आणि भाजपा यांचा समावेश आहे. मनसेचा महायुती समावेश झाल्यास राज्यात पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत आल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया शिंदे गटासह अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडं खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

एकाच बैठकीत 80 टक्के निर्णय- महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " गेली अडीच महिने महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत. मात्र, त्यांना अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, आम्ही एकाच बैठकीत 80 टक्के निर्णय घेतले आहेत. दुसऱ्या बैठकीत आम्ही उर्वरित 20 टक्के निर्णय घेणार आहोत.

हेही वाचा-

  1. Bala Nandgaonkar : राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी केला खुलासा
  2. Raj Thackeray Met Amit Shah : राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक
  3. MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण

Last Updated : Mar 21, 2024, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.