ETV Bharat / politics

महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिली सभा; उद्धव ठाकरेंवर निशाणा, नारायण राणेंचं कौतुक - Raj Thackeray Sabha - RAJ THACKERAY SABHA

Raj Thackeray Sabha : रत्नागिरी-सिधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Raj Thackeray
महायुतीला पाठींबा दिल्यानंतर पहिल्याच सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 9:57 PM IST

Updated : May 4, 2024, 10:25 PM IST

कणकवली Raj Thackeray Sabha : रत्नागिरी-सिधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

मग उद्योगधंदे बाहेर का गेले? : यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की, "हे मुख्यमंत्रिपद हवं होतं म्हणून विरोध करणारे आहोत, असं माझं नव्हत. भाजपानं अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री दिलं असतं तर आज जे बोलत आहात ते बोललं असत का? काल सांगितलं कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. वा रे वा 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा का विरोध केला नाही." तसंच कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्यांना माहित नाही का? की अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार, या शब्दांत मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक : "मी सरळ चालणारा आहे. ठाकरेंचा जेनेटिकली प्रॉबलेम आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. एखादी नाही पटली तर शेवटपर्यंत पटणार नाही. 2019 च्या सभेत मी मोदींचा जाहीर विरोध केला. कारण काही गोष्टी नाही पटल्या, त्या आजही पटत नाहीत. याबाबत आपण मोकळं असणं गरजेचं आहे. तसंच ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक करणारा मी आहे. जेव्हा पासून मला राजकारणाची समज आली किंवा उमज आली, तेव्हापासून मी पाहतोय आणि वाचतोय. तेव्हापासून 370 कलम रद्द करायचं सुरू आहे. मात्र, मोदींनी हे रद्द केलं. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल," असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

हेही वाचा :

  1. उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे नेते 'राज'दरबारी, काय आहे भेटीचं गणित? - Lok Sabha Election 2024
  2. उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत नेमकं काय घडलं? - Ujjwal Nikam Meet Raj Thackeray

Last Updated : May 4, 2024, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.