दौंड BARAMATI LOK SABHA : बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीनं महेश भागवत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महेश भागवत यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शेंडगे यांनी महेश भागवत विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
आरक्षणाचे लचके तोडण्याचा कार्यक्रम सुरू : यावेळी बोलत असताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, "बारामती प्रस्थापितांची मतं खंडित केल्याशिवाय या भागातील ओबीसी आणि मागासवर्गीय शांत बसणार नाहीत. महेश भागवत हे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत. प्रस्थापितांविरोधात विस्थापितांची लढाई बारामतीमध्ये होणार आहे. या भागातील ओबीसी, भटके विमुक्त आणि इतर सर्वजण कधी इथला उमेदवार पार्लमेंटमध्ये जातो या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना आम्ही 75 वर्ष निवडून दिलं त्यांनी आमच्या आरक्षणाचा सत्यनाश केलाय. हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. तसंच आरक्षणाचे लचके तोडण्याचा येथे प्रयत्न झालाय.'
...वही इस देश मैं राज्य करेगा : पुढं ते म्हणाले की, "आमचंच मत, आमचाच नेता आणि आमचीच सत्ता या दृष्टिकोनातून ही निवडणूक आम्ही लढत आहोत. 'जो ओबीसी के हित की बात करेगा वहीं इस देश मैं राज करेगा.' संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर, माळी, वंजारी, साळी, कोष्टी तसंच भटके विमुक्त या सगळ्यांची लढाई महेश भागवत लढत आहेत. त्यामुळं ओबीसींचा हा पठ्ठ्या आपल्याला पार्लमेंटमध्ये पाठवायचा आहे." तसंच बारामतीमध्ये होत असलेली लढत इतिहासातील सर्वात मोठी लढत असून ही लढत जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचंही शेंडगे म्हणाले.
हेही वाचा -