ETV Bharat / politics

विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा- ओबीसी संघर्षातून ध्रुवीकरण - Maratha VS OBC Reservation

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 9:49 PM IST

Maratha VS OBC Reservation : राज्यातील ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून यामुळं दोन्ही समाजात तेढ निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर या निमित्ताने दोन्ही समाजातील ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या वतीनं विरोधकांवर बैठकीला हजर न राहिल्याबाबत टीका सुरू आहे. तर सरकारला हा प्रश्न सोडवायचा नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असून लक्ष्मण हाके यांनी त्यांना थेट आव्हान दिल्यानं हा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे.

Maratha OBC Reservation
ओबीसी मराठा आरक्षण वाद (File Photo)

मुंबई Maratha VS OBC Reservation : राज्यामध्ये मराठा आरक्षणातील सगेसोयरे या शब्दाला असलेला आक्षेप, याबद्दल आठ लाखांहून जास्त आलेल्या हरकती, जास्तीत जास्त हरकती घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेलं आवाहन, या पार्श्वभूमीवर आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. त्यातच लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांनी सुद्धा उपोषण आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानं आता, एकीकडं मराठा आंदोलन आणि दुसरीकडं ओबीसी आंदोलन असं चित्र तयार झाले आहे. यामुळं दोन्ही समाजाचे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरण करण्याचा हा अंतस्थ प्रयत्न असल्याची चर्चाही सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (ETV BHARAT Reporter)

ध्रुवीकरणाची सुरुवात : ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद आणि त्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्याशी चर्चा करून घेतलेले निर्णय यामुळं राज्य सरकार मराठा समाजापुढे झुकल्याचं ओबीसी नेत्यांनी म्हटलं होतं. आता पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर ओबीसी समाजाने एकत्र येऊन केलेला विजयाचा जल्लोष हा या ध्रुवीकरणाची सुरुवात असल्याचं म्हटलं जातय.

जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा : राज्य सरकारनं जर मराठा समाजाबद्दल योग्य निर्णय घेतला नाही तर आपण मराठा समाजातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करू असा इशारा, जरांगे पाटील यांनी दिलाय. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 20 तारखेपासून उपोषणाचा इशारा दिलाय. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगल्याच फटका सहन करावा लागला. एकीकडं जरांगे पाटील हे महायुतीमधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर सातत्यानं टीका करत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर मात्र, त्यांनी फारशी टीका केली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाबद्दल त्यांची असलेली मवाळ भूमिका पाहता महायुती मधील पक्षांमध्येच आता या प्रश्नावरून मतभेद निर्माण होत आहेत.

मराठा आणि ओबीसी असा संघर्ष होणे योग्य नाही. अशा पद्धतीचा कोणताही जातीय संघर्ष राज्याला परवडणारा नाही. त्यामुळं हा प्रश्न सामंजस्यानेच सोडवावा अशी सरकारची भूमिका आहे. सरकारचे त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी आणि मराठा समाजाला योग्य न्याय दिला जाईल, संघर्षाची आणि जातीय तेड निर्माण करण्याची सरकारची किंवा महायुतीची कुठलीही भूमिका नाही. - केशव उपाध्ये, प्रवक्ते भाजपा

जरांगेचे वर्तन सरकार का सहन करते : या संदर्भात बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, आता ओबीसी समाजाला आपली ताकद दाखवणं भाग पडणार आहे. जरांगे पाटील यांचा सारखा एक व्यक्ती सरकारच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करतो. अनेकदा ते मुख्यमंत्री आणि नोकरशहा यांच्या विरोधात बोलतात. आपल्याला हव्या त्या अटी सरकार समोर ठेवतात आणि सरकार ही त्या मान्य करतात. जरांगे यांचे हे वर्तन सरकार कसे काय सहन करते असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं आता ओबीसी समाज सुद्धा या प्रश्नावर एकवटण्याची शक्यता निर्माण झालीय. याबद्दल बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसींचा संयम आता संपतो आहे. आतापर्यंत शांतता आणि संयम राखला पण आम्हाला कोणीही गृहीत धरू नये. मराठ्यांनी ओबीसी कोट्यातील आरक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही आक्रमकपणे प्रतिकार करू, आमच्या भावनांचा अनादर झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळांची आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका; म्हणाले, बारामतीवरून फोन आला अन्.... - Chhagan Bhujbal
  2. "विधान परिषदेत निवडून आले म्हणून आम्हाला त्रास देऊ नका"; मनोज जरांगे पाटील यांचा कुणाकडं रोख? - Manoj Jarange Patil
  3. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.