जालना Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत असल्यानं, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, मी समाजासाठी लढत आहे, ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही.
झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी : याप्रकरणी मराठा बांधव आक्रमक झाला आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या राहत्या घरी आणि अंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी रात्री ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कोणीतरी अज्ञात हेरगिरी करत आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. या लोकांचा शोध घेवून कारवाई करण्यासंदर्भात आज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची जालना येथे भेट घेतली आणि जरांगे पाटील यांना 'झेड प्लस' सुरक्षा पुरवण्याची मागणी केलीय.
मी मुक्कामी राहात असलेल्या घरावर ड्रोनची टेहळणी झाली. मला कुणी गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही. मात्र, हे कुणी केलं ते माहीत नाही. मीही क्षत्रिय मराठा आहे, कुणाला भीत नाही आणि मला गोळ्या घातल्या तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. - मनोज जरांगे पाटील, मराठी आंदोलक
घातपाताचा डाव असण्याची शक्यता : मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील महत्वाचे व्यक्तिमहत्व आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून असे निर्देशनास आले आहे की, मनोज जंरागे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी ज्या ज्या घरी राहतात त्या ठिकाणची आणि आंदोलन स्थळाची वाईट उद्देशाने घातपात करण्याच्या हेतूने ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यांच्या दररोजच्या हालचालींवर लक्ष ठेवून वेळ साधण्याचा हा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. काही घातपाताचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कार्यकर्त्यांना वाटतय.
सोशल मीडियातून रोष व्यक्त : दोन दिवसापासून लाखो मराठा समाज फोन करुन आणि सोशल मीडियातून याविषयी चिंता आणि रोष व्यक्त करत आहेत. जरांगे पाटील मराठा समाजाचे मोठे नेतृत्व असल्यामुळं त्यांच्याविषयी सर्व समाज सुरक्षेच्या काळजीपोटी भावनिक होत राग व्यक्त करत आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना तत्काळ 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात यावी ही मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या मागणीचा विचार तत्काळ व्हावा. तसेच या विषयाचं गांभीर्य पोलीस प्रशासनाने समजून घ्यावं. पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेवून, कारवाई करावी अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीनं पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना करण्यात आलीय.
हेही वाचा -
- जरांगेंच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावात भीतीचं वातावरण; शंभुराज देसाई म्हणाले - "गरज भासल्यास..." - Manoj Jarange Patil
- जरांगे पाटलांच्या 'मातोरी' गावात दगडफेक:डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती; दुचाकी फोडल्या...! - Manoj Jarange Matori Village
- ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्र आले; लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका - Laxman Hake On Jarange Patil