ETV Bharat / politics

ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला काय-काय दिलं आश्वासन? - Thackeray Group Manifesto

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 7:38 PM IST

Updated : Apr 25, 2024, 8:50 PM IST

Thackeray Group Manifesto : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.

Lok Sabha Election 2024 Manifesto of Thackeray Group published
ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई Thackeray Group Manifesto : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी (25 एप्रिल) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रावर केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांवर विशेष लक्ष : या जाहीरनाम्यात शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात येईल. सरकार जीएसटीच्या रूपात शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांचा टॅक्स वसूल करत असून त्या बदल्यात सहा हजार रुपये देतंय. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल. तसंच पिकाचं नुकसान झाल्यास जो पीक विमा मिळतो त्यासाठी अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व जाचक अटी खासगी कंपन्यांनी ठरवलेल्या आहेत, त्या बदलून आम्ही योग्य ते निकष लावून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसा विमा मिळेल याची तरतूद करू, असंही ते म्हणाले.

हुकूमशाही संपवण्याची संधी : पुढं ते म्हणाले की, "आपला देश हुकूमशाहीकडं वाटचाल करतोय. लोकसभा निवडणुकीच्या रूपानं आपल्याला हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण देशावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असं होऊ नये. संविधानाची संघराज्य पद्धत असून त्याला अनुसरून कारभार झाला पाहिजे, हे आमचं मत आहे. मी गुजरातच्या विरोधात नाही, महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवलं जातंय. प्रत्येक राज्याच्या हक्काचं त्या-त्या राज्याला मिळायलाच हवं."

...त्यामुळं आम्ही सत्तेतून बाहेर पडलो : "2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर युतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही सर्व तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडं गेलो होतो. अनेक वर्षांनी देशात एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं होतं, आणि त्याच बहुमताच्या जोरावर मग त्यांनी नोटबंदी केली. त्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी कलम 370 हटवलं, तेव्हाही आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण, आता त्याची चूकीची प्रवृत्ती समोर आली आहे. त्यांना पाशवी बहुमत हवंय, जेणेकरून ते देशाचे संविधान बदलू शकतील, देशातील लोकशाहीची हत्या करू शकतील. आणि हे रोखण्यासाठीच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो."

"महाविकास आघाडी सरकारशी गद्दारी करून ट्रिपल इंजिन असलेलं सरकार महाराष्ट्राला लुटण्याचा डाव आखतंय. साहजिकच त्याला केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात उद्योगांचं अपहरण होत असून हिऱ्यांचा व्यापार, क्रिकेटचे सामने, फिल्मफेअर इव्हेंट हायजॅक केले जात आहे. देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ही लूट थांबवू", असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

हेही वाचा -

  1. अग्नीवीरसह कंत्राटी नोकर भरती रद्द करणार...राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं जाहीरनाम्यात काय दिली आहेत आश्वासनं? - NCP SCP releases manifesto
  2. राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; यशवंतराव चव्हाणांना 'भारतरत्न' मिळण्यासाठी करणार प्रयत्न - NCP Manifesto
  3. महायुतीच्या वेगळ्या जाहीरनाम्याची शक्यता नाही; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 25, 2024, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.