ETV Bharat / politics

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला महेश तपासे यांचं प्रत्युत्तर; म्हणाले... - Mahesh Tapase

Mahesh Tapase On Devendra Fadnavis : 'जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही', अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mahesh Tapase criticized Devendra Fadnavis over his statement regarding Jayant Patil
देवेंद्र फडणवीस आणि महेश तपासे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 4:07 PM IST

शरदचंद्र पवार गट प्रवक्ते महेश तपासे

मुंबई Mahesh Tapase On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचार, बैठका, कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, असं असतानाच 'लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, जयंत पाटील कुठे आहेत', असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

महेश तपासे यांची टीका : देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले की, "जयंत पाटील हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं फडणवीसांनी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. तसंच आपण आपल्या पक्षात सुरुवातीला अनेक नेत्यांना हिरवा कंदील दिला होता. ते सध्या प्रतीक्षेत असून त्यांची काळजी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील चार ते पाच तिकीटं कापली गेली, अजित पवार यांच्या पक्षात देखील तीच परिस्थिती आहे, त्याची चिंता करा", असं ते म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? : शनिवारी (6 एप्रिल) भाजपाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, "जयंत पाटील हे सध्या त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही. सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण, जयंत पाटील तुम्हाला कुठे दिसताय का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार (Rohit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) हेच दिसत आहेत. जयंत पाटील आहेत कुठे? समजनेवालो को इशारा काफी है", असं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी काय म्हणाले? - eknath khadse to Join BJP
  2. "फडणवीसांनी एकदाही अजित पवारांचा उल्लेख...", अमोल कोल्हे यांची जोरदार टोलेबाजी - Lok Sabha Election 2024
  3. "प्रसिद्ध नट तर घ्यायचा"; जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला - Jayant Patil On Govinda

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.