ETV Bharat / politics

VIDEO : नाशिकमध्ये राडा, खासदार सुप्रिया सुळे थेट पोलीस आयुक्तांच्या भेटीला, म्हणाल्या, "केसालाही धक्का..." - SUPRIYA SULE

विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार जोरात सुरू आहे. अशातच नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलं.

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे (File PHoto)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 7:14 PM IST

Updated : Nov 14, 2024, 7:42 PM IST

नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राडा झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांचे भाऊ आणि पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप गिते यांनीच केला. या वाहनातून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत महायुती उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी वाहनावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तालयात जात पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली.

गणेश गिते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी : नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडं भाजपातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले गणेश गिते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचे बंधू आणि पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांच्या वाहनातून पैसे वाटप होत असल्याचं म्हणतं, महायुतीचे उमेदवार ढिकले यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप गिते यांनी केला. तसंच या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही गिते समर्थकांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)

असे हल्ले आम्ही खपून घेणार नाही : खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपली सभा रद्द करून त्या नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या. "महायुतीकडून अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे, ही खूप चिंताजनक बाब आहे. यापुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवार किंवा पदाधिकारी यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करा, अन्यथा मी स्वतः मुंबई येथे गृहमंत्र्यांच्या घराबाहेर आमरण उपोषण करेन," असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

हेही वाचा -

  1. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास वर्षभरात मुंबई-गोवा महामार्ग तयार होणार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं विधान
  2. मराठवाड्यात विकासाची गंगा आणणार, काश्मीरमध्ये वेगळं संविधान आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  3. VIDEO : उद्धव ठाकरेंची श्रीगोंद्यात तिसऱ्यांदा तपासली बॅग; म्हणाले, "मिंध्यांची बॅग..."

Last Updated : Nov 14, 2024, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.