ETV Bharat / politics

सावरांच्या मागं 'श्रमजीवीं'चं बळ, महायुतीला मिळाला आणखी एक मित्र; पालघरमध्ये भाजपा भक्कम - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा विजय अधिक पक्का आणि भक्कम करण्यासाठी भाजपानं वेगवेगळी पावले उचलली आहेत. खासदार राजेंद्र गावित यांना भाजपात आणून आदिवासी व अन्य समाज घटक जवळ केल्यानंतर आता पंडित यांची श्रमजीवी संघटना मदतीला घेतलीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 9:47 PM IST

सावरांच्या मागे 'श्रमजीवीं'चं बळ
सावरांच्या मागे 'श्रमजीवीं'चं बळ (ETV Bharat Reporter)

पालघर Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या मदतीला विवेक पंडित यांची श्रमजीवी संघटना धावून आलीय. गेल्या काही वर्षांपासून भाजपा आणि श्रमजीवी संघटनेचे अनेक बाबतीत मतैक्य असल्यानं आता या संघटनेचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत चांगला फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा विजय अधिक पक्का आणि भक्कम करण्यासाठी भाजपानं वेगवेगळी पावले उचलली आहेत. खासदार राजेंद्र गावित यांना भाजपात आणून आदिवासी व अन्य समाज घटक जवळ केल्यानंतर आता पंडित यांची श्रमजीवी संघटना मदतीला घेतलीय.

श्रमजीवी संघटनेच्या कामाचा फायदा : पालघर जिल्ह्यासह राज्यात श्रमजीवी संघटनेचं काम अतिशय चांगलंय. आदिवासींच्या तसंच महिलांच्या विविध प्रश्नावर श्रमजीवी संघटना आंदोलन करते. वेठबिगारांना मुक्त करते. श्रमजीवी संघटनेचं काम वेगवेगळ्या समाज घटकांत आहे. या समाज घटकाचा वापर आता भाजपासाठी करण्याचा निर्णय पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्यात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत घेण्यात आलाय.

मोदींच्या हाती देश सुरक्षित : यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असून देशाचं भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे. त्यामुळं डॉ. सावरा यांना पाठिंबा देत असल्याचं पंडित यांनी जाहीर केलंय. मोदी यांनी गेल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत आदिवासींसाठी राबवलेल्या विविध महत्त्वपूर्ण विकास योजनांची चर्चा करण्यात आली. त्यांच्यामुळंच आदिवासी समाज आज मुख्य प्रवाहात आलाय. त्यांची विकासाची भूमिका आमच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं अनुकूल आहे, म्हणून श्रमजीवी संघटना महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पंडित यांनी सांगितलं.

श्रमजीवीनं केलं प्रचाराचं नियोजन : श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आता डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारात सहभागी झाले असून त्यांना विजयी करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत या वेळी घेण्यात आलाय. पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सावरा यांच्या प्रचारासाठी आता श्रमजीवी संघटनेची जिल्हा व तालुका पातळी तसंच गाव पातळीवर यंत्रणा सक्रिय झालीय. प्रचार कसा करायचा, गावफेरी कशी काढायची याबाबत या वेळी निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार तसंच राज्यातील महायुती सरकार आदिवासींच्या विकासासाठी काय काम करते आणि आदिवासींसाठीच्या योजना त्यांनी कशा अंमलात आणल्या, आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत या योजना कशा पोहोचवता येतील, यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आता प्राधान्य असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'माझ्या लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान’, पंतप्रधान मोदी सॅम पित्रोदावर खवळले - Pm Modi Reaction On Sam Pitroda
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी बजाविला मतदानाचा हक्क, पाहा संपूर्ण यादी - lok sabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.